आपला जिल्हा

सह्याद्री माझा व जन आंदोलन इफेक्ट :तांदळवाडी धान्य घोटाळाप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

बीड — तांदळवाडी च्या जनतेने काळ्याबाजारात जाणारे राशन धान्य पकडून दिले. तहसीलदार वमने यांनी याप्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र धान्य घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले शिवाय 6 ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता . “सह्याद्री माझा” ने हा विषय बातम्यांच्या माध्यमातून उचलून धरला होता. शेवटी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा  यांनी याप्रकरणी लक्ष घालून चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीची स्थापना केली. समितीला दोन दिवसात फौजदारी गुन्हा संदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तांदळवाडी ग्रामस्थांनी 16 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राशनचे धान्य काळ्याबाजारात घेऊन जाणारा पिक अप क्र. एम एच 12 एल टी.4653 पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. खडकी राशन दुकानाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वी रास्ता रोको केला होता. माल पकडून दिला तरी आरोपी दुकानदारा ला तहसीलदार वमने पाठीशी घालत असल्याच दिसून आल्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी 27 सप्टेंबरला जलसमाधी आंदोलन केले. यावेळी पुरवठा अधिकारी भारती सागरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या डोळ्यात धूळफेक करत जुन्या तक्रार अर्जाच्या चौकशी अहवालावरून खडकी चे दुकान निलंबित केले. परंतु पकडलेल्या धान्यात संदर्भात आरोपी मोकाट असल्याचं पाहायला मिळालं. शेवटी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विश्वस्त एड. अजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहा ऑक्टोबरला धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रौळसगाव जवळ रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. यासोबतच ” सह्याद्री माझा ” ने सातत्याने हा विषय बातम्यांच्या माध्यमातून लावून धरला. तसेच पुरवठा विभागात असलेला भ्रष्टाचार उजागर करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
दरम्यान याप्रकरणी जिल्‍हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी स्वतः लक्ष देऊन खडकीचे राशन दुकानदार पंचवटी बालासाहेब भोसले यांचे वारसा प्राधिकार पत्र वर्ग करण्यात आल्यापासून माहे ऑक्टोबर 2020 पासुन मंजूर नियतन,ऑनलाइन ट्रांजेक्शन नुसार वितरीत केलेल्या धान्याची चौकशी करण्यासाठी सहा जणांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या चौकशी समितीत केज चे तहसीलदार डि एस मेंडके, जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी बी एस जाधवर, शिरूर चे नायब तहसीलदार एस एम पालेपाड, सहाय्यक लेखाधिकारी टि बी निर्मळ, विकास हजारे व जयदत्त चव्हाण यांचा समावेश करण्यात आला असून समितीला दोन दिवसात फौजदारी गुन्हा संदर्भात स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्याच प्रमाणे नेकनूर पोलिस स्टेशनचे एपीआय श्री. शेख यांनी टेम्पो पोलिसांच्या ताब्यात घेतला. तर प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी पकडलेले धान्य चौसाळा गोदामात पाठवले आहे. दरम्यान दोन दिवसात अहवाल आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्या मुळे सहा ऑक्टोबर रोजी होणारा रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close