आपला जिल्हा

सागरेबाईंचा नवा फंडा,नाॅमिनी ट्रान्जेक्शनचा वापर करत राशन मालाचा घातला जातोय गंडा

बीड — सागरेबाई यांच्या काळात धान्य घोटाळ्याच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या सात महिन्यांपासून राशन कार्ड धारकाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने रेशन दुकानदाराचा मशीनवर मालाचे ट्रांजेक्शन केल्या जाते. पाच पन्नास रेशन कार्डधारकांना दुकानदार माल देतो. असं असलं तरी नॉमिनी अंतर्गत 80% ट्रांजेक्शन दाखवून धान्याचा काळा बाजार केला जात आहे. हा सर्व खेळ पुरवठा अधिकाऱ्याच्या संगनमताने केला जात आहे.
जिल्ह्यातील राशन धान्य दुकानदारांना हाताशी धरून गोरगरिबांच्या हक्काचं धान्य सरास काळ्याबाजारात विक्री केल्या जात आहे. लॉकडाऊन काळात लोकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली असताना गरिबांच्या पोटावर सागरेबाई सारख्या गलेलठ्ठ पगार कमावणार्‍या अधिकारी कर्मचारी यांनी राशन दुकानदारांच्या संगनमताने पाय देण्याच काम केल्याचं पाहायला मिळालं. गोरगरिबांना धान्य मिळालं नाही परिणामी त्यांना अंगणवाडीतून दिला जाणारा पोषण आहार कुटुंबाचे पोट भरण्यासाठी वापरावा लागला. यातून कुपोषणाचं प्रमाण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं. भ्रष्टाचारासाठी नवनवे फंडे अवलंबिले जाऊ लागले. अनेक दुकानदार महिन्यातून फक्त दोन दिवस घंट्या अर्धा घंट्यासाठी दुकान उघडल्याचा नाटक करतात. पण या दुकानांमधून 80 टक्के धान्य जनतेला वाटप केल्याचं दाखवल्या जातं. जवळच्या दहा ते पंधरा लोकांनाच खरोखर या योजनेचा लाभ मिळतो. पुरवठा विभागातून राशन धान्य दुकानदाराच्या मशीन वर नॉमिनी अंतर्गत धान्य ट्रांजेक्शन केल्या जाते. दुकानदार 80 टक्के माल विकल्याचं दाखवतो. पण हे धान्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात सर्रास विकल्या जातं. हा सर्व प्रकार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या संगनमताने आपले आपले हिस्से ठरवून केला जातो. जवळपास हा सर्व प्रकार गेल्या सात महिन्यांपासून केल्या जात आहे. सर्वसामान्य माणसाला याची भनक देखील या लोकांनी लागू दिली नाही. तांदळवाडी सारखे प्रकरण समोर आलेले असताना कारवाई न करणाऱ्या सागरे बाई या प्रकरणात आता कशा कारवाई करतील असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे? येणाऱ्या काळात तरी गोरगरिबांना आपल्या हक्काचा धान्य मिळणार की नाही? अधिकार पदाच्या खूर्च्या ऊबविण्यातून निपजलेले भ्रष्टाचाराचे किडे हे धान्य खाऊन टाकणार? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close