आपला जिल्हा

तांदळवाडी धान्य घोटाळा प्रकरण:पुरवठा विभागाच्या विरोधात उद्या दि.६ रोजी रौळसगाव फाट्यावर रास्ता रोको

बीड — जिल्ह्यातील पुरवठा विभागाची यंत्रणा एकदम कुचकामी झाली असून भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. संगणमत होत असल्याचे सकृतदर्शनी दिसत असून यामुळे कोणताही दबाव यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांवर राहिलेला नाही. तांदळवाडी घाट येथे पकडलेला टेम्पो पंचवीस दिवस झाले, तरी जागेवर आहे. त्यामुळे दोषींवर गुन्हा नोंद होण्यासाठी उद्या दिनांक ६ रोजी सकाळी ११ वाजता शिधा पत्रिका धारक जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांच्यासह या फाट्यावर नॅशनल हायवे रोखणार आहेत.

दरम्यान पुरवठा विभाग सुस्त झालेला असून या विभागातील अधिकाऱ्यांचा स्वस्त धान्य दुकानदार यांचेवर त्याचप्रमाणे काळाबाजार करणाऱ्यांवर कुठलाही धाक राहिला नसल्याचा आरोप अँड. अजित देशमुख यांनी केला असून आजच कारवाई झाली नाही तर दिनांक ८ ऑक्टोबर रोजी या यंत्रणेला विभागीय आयुक्त यांचे समोर उभे करून जाब विचारला जाईल, असा इशाराही दिला आहे.

त्याचबरोबर जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी जिल्ह्यात असे जे प्रकार घडत आहेत. त्यावर तात्काळ नियंत्रण ठेवावे अन्यथा एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली की, जिल्हाधिकाऱ्यांचा धाक देखील राहणार नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलून प्रशासनाने काम करावे. अन्यथा जनतेला त्रास होईल, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

पंचवीस दिवसानंतर पकडलेला टेम्पो त्याच जागी उभा आहे. शिवाय सातत्याने चालू असलेल्या पावसामुळे त्यातील धान्य देखील भिजून करे फुटले आहेत. दुकानदार आणि संबंधितावर गुन्हा दाखल होत नाही. एवढ्या प्रचंड गैरप्रकारांना पुरवठा विभाग लपवत असल्याने आणि त्यांची पाठराखण करत असल्याने उद्याचा रस्ता रोको मोठ्या संख्येने होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close