आपला जिल्हा

या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

सन 2021चा वैद्यकशास्त्रातील ‘नोबेल’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पॅटापोशन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
तापमान आणि बल यामुळे शरीरात संवेदना जागृत होण्याच्या प्रक्रियेतील मूलभूत संशोधनाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तापमान आणि यांत्रिक बल यांची जाणीव शरीरामध्ये होत मज्जातंतूमध्ये आवेग तयार होतो, या सर्व प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं पुरस्काराची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटलं आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close