आपला जिल्हा

आत्मदहन केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील झाडावर चढून आंदोलन

बीड — पाटबंधारे कार्यालयासमोर आत्मदहन केलेल्या आंदोलकाच्या पत्नीने म. गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तिने केली. मात्र या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज तिने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या झाडावर चढून आंदोलनास सुरुवात केली.

तारामती अर्जुन साळुंके असे या आंदोलनकर्त्या महिलेचे नाव आहे. तारामती यांचे पती अर्जुन साळुंके यांनी पाटबंधारे कार्यालयासमोर 23 नोव्हेंबर 2020 रोजी मावेजा मिळावा यासाठी आत्मदहन केले होते. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक वर्ष उलटून गेल्यानंतर देखील उपजिल्हाधिकारी भूसंपादन, कार्यकारी अभियंता पाटबंधारे, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या विरोधात अर्जुन साळुंके यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याबाबत गुन्हा नोंद झाला होता. असं असताना देखील कारवाई न झाल्याने तारामती साळुंके या महात्मा गांधी जयंती दिनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या. दरम्यान दोन दिवस उलटून देखील या आंदोलनाची दखल न घेतल्याने त्या आज सकाळी चक्क झाडावर चढल्या आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या महिलेला खाली उतरवत ताब्यात घेतले. आता तरी त्यांना प्रशासन न्याय देईल का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे दरम्यान या प्रकारामुळे सकाळच्या शांततेच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ माजली होती.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close