आरोग्य व शिक्षण

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नगरमधील 61 गाव लाॅक डाऊन

नगर — दहा पेक्षा जास्त सक्रीय करोनाबाधित रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावे आता लॉकडाउन करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी रविवारी हा आदेश काढला आहे.
4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर रात्री बारापर्यंत गावे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आला आहे. त्यात संगमनेरमधील तब्बल 24 गावांचा समावेश आहे.
संगमनेरमधील गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्‍वी बुद्रुक, आश्‍वी खुर्द, पारेगाव बुद्रुक, पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगाव पान, सायखिंडी या गावे बंद करण्यात आली आहे. त्यात जास्त लोकसंख्येची गावे आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, आष्टी,

राहाता तालुक्यातील भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, कोर्‍हाळे, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार बुद्रुक हे सात गावे बंद ठेवण्यात आली आहेत.
पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक, कान्हूरपठार, गोरेगाव, दैठणे गुंजाळ, जामगाव, भाळवणी ही सहा गावे बंद करण्यात आली आहेत. अकोले तालुक्यातील लिंगदेव, विरगाव, परखतपूर, कर्जतमधील खांडवी, बाभूळगाव दुमाला, कोपरगावमधील गोधेगाव,

नेवासा तालुक्यातील कुकाणा, पाथर्डीतील तिसगाव, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाणे बुद्रुक, श्रीरामपूरमधील बेलापूर खुर्द, उक्कलगाव, कारेगाव अशी गावे 13 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग सेंटर वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू-विक्री सेवा बंद ठेवण्यात आले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close