आपला जिल्हा

शेतकरी कुटुंबातील गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप

औरंगाबाद — आज रोजी ‘एक हात मदतीचा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत शिरापूर ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील शेतकरी , कष्टकरी मजुरांच्या आर्थिकदृष्ट्या वंचित घटक समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

                     याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन गौरवचे मुख्य संपादक रामदास वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर येथील प्रसिद्ध अभियंता नानासाहेब जिवडे , पंचप्राण ट्रेकिंग समूह प्रमुख विजय विरकर , प्रा.सचिन गिते ,प्रा. सांगळे सर , प्रा. अशोक डोळस, प्रशालेचे शाळेचे मुख्याध्यापक विश्वास बुधवंत सर , शालेय समितीचे सदस्य दिलीप बुधवंत, बाळासाहेब पोपळभट, लोखंडे ,आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमात जीवन गौरव मासिक साहित्यकला लेखक वाचक मंचाच्यावतीने मान्यवरांचा जीवन गौरव ,शाल व पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी ३० विद्यार्थ्यांना जीवन गौरवच्या वतीने मोफत उपयुक्त शालेय साहित्य , आणि खाऊ वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन गौरवचे देविदास बुधवंत यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास वाघमारे सरांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास बुधवंत यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक विश्वास बुधवंत सर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोक डोळस,देविदास बुधवंत, रज्जाक शेख यांनी मेहनत घेतली.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close