आपला जिल्हा

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी संजय आंधळे यांचा केला गौरव; तब्बल ४४४ रक्तदात्यांनी केले होते रक्तदान

लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराचा बीड जिल्ह्यात पहिला नंबर
वडवणी — कोरोना काळात बीड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता.त्यामुळे अनेक गोरगरीब रुग्णांना रक्ताची गरज भासत होती.या जाणिवेतून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय आंधळे व डीसीसी बँकेचे विद्यमान संचालक अमोल आंधळे यांनी वडवणी शहरात १२ डिसेंबर लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. वडवणी तालुक्यातील तरुणांनी या रक्तदान शिबीरास प्रचंड प्रतिसाद देत कोरोनाच्या काळात ४४४ रक्तदात्यांनी रक्तदान करत जिल्ह्यात नवा उच्चांक प्रस्थापित केला होता.या उत्कृष्ट कार्याची बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दखल घेत रक्तदान शिबिरात वडवणी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय आंधळे यांनी बीड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शुक्रवारी जाहीर करत.संजय आंधळे यांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.त्यामुळे जिल्ह्याभरातुन‌ लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय आंधळे व डीसीसी बँकेचे संचालक अमोल आंधळे या दोन्ही बंधुचे कौतुक अभिनंदन केले जाते आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान वडवणी हे गेल्या दहा वर्षांपासून रक्तदान शिबिर घेत आहेत. आत्तापर्यंत रक्तदान शिबीरामध्ये २५०० ( अडिच हजार) पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे हजारो गोरगरीब रुग्णांना रक्तबॅग पुरवत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी यांनी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत वडवणी शहरात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्टानाचे अध्यक्ष संजय आंधळे व डीसीसी बँकेचे संचालक अमोल आंधळे यांनी भव्य रक्तदान शिबिर घेतले होते.या शिबीरात ४४४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन जिल्ह्यात रेकॉर्ड केला होता.या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी संजय आंधळे यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव गेला. व जिल्हाधिकारी शर्मा यांनी आपल्या भाषणात आंधळे बंधुचे विशेष कौतुक केले आहे.यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. जयश्री बांगर तसेच विविध विभागांचे प्रमुख शासकिय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रक्तदान‌ शिबीराचा संकल्प अविरतपणे सुरू ठेवणार- संजय आंधळे

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गेली दहा वर्षे रक्तदान शिबीराचे आयोजन एक सामाजिक कार्य म्हणुन वडवणी शहरात करण्यात येत आहे. या कार्यक्रमात बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार प्रीतमताई मुंडे यांची आवर्जून हजेरी असते व या सामाजिक कार्याच्या माध्यमातून
आतापर्यंत २५०० पेक्षा जास्त रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. अणि यांचा उपयोग गोरगरिब रुग्णांना झाला आहे. कित्येक जणांना जिवदान मिळाले आहे.लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या वतीने गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी अविरतपणे रक्तदान शिबिर सुरू ठेवणार असा आमचा संकल्प आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close