महाराष्ट्र

सागरे बाई नुसती खुर्ची उबवू नका; त्या ऊबवण्यातून निघालेले भ्रष्टाचाराचे किडे वळवळू लागले;ना. तहसीलदार धान्य जागेवरच टाकून पळाला

बीड — सागरेबाई पुरवठा अधिकाऱ्याची खुर्ची नुसती ऊबविण्यासाठी नसून तुमच्या कारभारात निर्लज्ज पणाने कळस गाठला आहे. शब्दांनाही थोडी लाज असते पण तेवढी देखील आपल्याला राहिली नसल्याचं दिसत आहे. आज नामलगाव फाट्यावर राशनच धान्य जनतेने पकडून दिलं. त्याचा पंचनामा नायब तहसीलदाराने केला. पण ते धान्य स्वतःच्या अथवा पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी टाकून पळून आला. पाऊस आला तर ते धान्य तुमच्या कारभारा सारखंच सडून दुर्गंधी सुटेल याचा तरी विचार करायला पाहिजे होता.


सागरेबाई पैशापुढे लाजलज्जा शरम हया मानापमान या सारख्या गोष्टी किती तुच्छ आहेत हे तुम्ही आपल्या कर्मातून सिद्ध करत आहात. गमहिलेला अन्नपूर्णेचा दर्जा दिलेला असताना आपण मात्र गोरगरिबांच्या तोंडावर मारण्यासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यातूनच भ्रष्टाचाराची अंडी खुर्चीवर बसून उबविण्याचे काम सुरू केला आहे. त्यातूनच पाच हजाराहून अधिक राशन कार्डांचा घोटाळा आपण सहज पचवला. लाॅकडाऊन काळात धान्याचा काळाबाजार होऊन देखील आपण कारवाई काहीच केली नाही. लाज एवढी नाकाला गुंडाळली आहे की तांदळवाडी तील नागरिकांनी आई माई उधळली त्याचं देखील तुम्हाला काहीच वाटलं नाही. उलट त्या आंदोलनकर्त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. बापाचा माल असल्यासारखा तो आजही तांदळवाडीत तसाच सडण्यासाठी सोडून दिलात. जनता शिव्या देत आहे. माध्यम देखील टीका करत आहेत. पण आपल्या कारभारात तसूभरही फरक पडला नाही. आज नामलगाव फाट्यावर माळापुरी राशन दुकानातून काळ्याबाजारात जाणारे धान्य जनतेने पाठलाग करून पकडले. तुमचा नायब तहसीलदार पंचनामा करायला तेथे गेला. दोन कागद काळे केले. मोठा कर्तव्य केल्याच्या आविर्भावात थोबाड घेऊन तहसील ला वापस आला. आता ते धान्य पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही. तुमच्या पुरवठा विभागाने ही ताब्यात घेतलं नाही. रस्त्यावरच धान्य पडून आहे. पाऊस येऊन ते भिजणार. त्याची दुर्गंधी रस्त्यावर पसरणार. त्या दुर्गंधीमुळे जाणारा येणारा शिव्यांची लाखोळी वाहणार. पकडलेले धान्य तुमच्या व हाताखालच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बापाचं नाही ते जनतेचं आहे‌. हे विसरू नका. या पूर्वीच सह्याद्री माझा ने आपल्या माध्यमातून जनता करत असलेलं आवाहन तुमच्या पर्यंत पोहोचवलं होतं. तुम्हाला महिन्याकाठी किती पैसा लागतो ते सांगा आम्ही पट्टी गोळा करू ती तुम्हाला देऊ. पण हजार दोन हजार रुपयांवर आपलं ईमान विकू नका असं सांगून देखील फरक पडलाच नाही. काम होत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी आता जनतेत जोर धरू लागली आहे.अजुनही वेळ गेली नाही. अजूनही कारभार सुधारा असा आवाहन जनतेतून केलं जात आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close