ब्रेकिंग

सनदी लेखापाल (CA) शहाजी चव्हाण यांचे निधन

बीड — हिंगणी सारख्या ग्रामीण भागातून पुणे येथे आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर सनदी लेखापाल (CA) म्हणून कामकाज पाहताना आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे शहाजी भानुदास चव्हाण यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते.

शहाजी भानुदास चव्हाण हे “आप्पा ” या नावाने तरुण वर्गामध्ये परिचित होते. अतिशय कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी पुण्यासारख्या शहरात जाऊन आपला ठसा उमटवला. गावाकडे आल्यानंतर आबालवृद्धांना ते तोंड भरून बोलत असत त्यांची ख्यालीखुशाली विचारत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असत त्यामुळे नेहमीच प्रेमाने त्यांच्या भोवती माणस जमा व्हायची. मात्र आज सकाळी पुणे येथे त्यांचे निधन झाल्याचे कळाल्यानंतर चौसाळा पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दुपारी 4.00 वाजता हिंगणी बुद्रुक येथील त्यांच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे. चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात
” सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close