ब्रेकिंग

सागरेबाई फेकलेल्या तुकड्याशी कुठपर्यंत इमानदार राहणार? आरोपीवर गुन्हे कधी दाखल करणार गुन्हे कधी दाखल करणार — आंदोलनकर्ते ठाम

बीड — तांदळवाडी राशन धान्य घोटाळा प्रकरण पेटले असून पालक मंत्र्यांसोबत संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत चोरटा तहसीलदार वमने या ठिकाणी बोलवा. स्वस्त धान्य दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल. अशी मागणी करत जलसमाधी आंदोलन दोन ते तीन दिवस सुरू राहिले तरी चालेल अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. खडकीच्या रेशन दुकान भारती सागरे यांनी निलंबित केला असला तरी, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आंदोलनकारी गुन्हे नोंद करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

वारंवार प्रशासनाकडे गोरगरिबांचे धान्य देण्यात यावे यासाठी अर्ज विनंत्या करूनही फायदा झाला नाही. रौळसगांव येथे धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात आला. त्याचाही फायदा झाला नाही. राशन चा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना तांदळवाडी च्या जागरूक नागरिकांनी पकडून दिला. तहसील चा अहवाल आला नाही म्हणून पोलिसांनी आरोपींना पाहुणचार करून सोडून दिले. आठ दिवस झाले तरी गुन्हा नोंद झाला नाही. वाळू माफियांना धान्य माफियांना अभय देणारा शिरिष वमने माध्यमांचा दबाव वाढताच रजा टाकून पळून गेला. रजा टाकल्याच नाटक केलं तरी बीड मध्ये बसून धान्य घोटाळ्यावर पडदा कसा टाकता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. सह्याद्री माझा ने गेल्या आठ दिवसापासून या प्रकरणात रान उठवल्यानंतर ही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सागरे यादेखील या धान्य माफियांना पाठबळ देत असल्याचे चित्र पहावयास मिळालं. संदीप क्षीरसागर यांनी राजकीय भवितव्य पणाला लावत आरोपीला पाठबळ देण्याचे काम करत बालाघाटावरील जनतेचा रोष ओढवून घेतला. दोन तीन दिवसापूर्वी तांदळवाडी खडकीच्या लोकांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देऊनही याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी भारती सागरे, जिल्हाधिकारी शर्मा पोलीस अधीक्षक राजा रमास्वामी यांनी दुर्लक्ष केले. शेवटी आज दोन गावच्या लोकांनी जलसमाधी आंदोलनास सुरुवात करत. पालकमंत्र्यासह बीड चे आमदार, पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी जिल्हाधिकारी नेकनुरचे पी आय यांना धरणाच्या पाण्यात उतरून शिव्यांची लाखोली वाहिली. अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा साजरा करत. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत. या प्रकरणातला चोरटा तहसीलदार वमने या ठिकाणी येत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान भारती सागरे यांनी चोरटा तहसीलदार वमने यांना पाठीशी घालण्यासाठी पुन्हा एक डाव खेळला आहे. खडकी ते राशन दुकान निलंबित करण्याचा आदेश दिला असला तरी. खाल्ल्या मिठाला जागत भारती सागरे यांनी अजूनही आरोपींना पाठीशी घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत. आंदोलनकर्त्यांनी शेवटी पुरवठा अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोळी वाहिली. पुरवठा अधिकारी भारती सागरे तसेच रजेवर गेलेला तहसीलदार वमने किती इमानदार कुत्र्याला ही लाजवेल असे कर्तव्य पार पाडत खाल्लेल्या तुकड्याला जागण्याचा काम करत असल्याचं पाहायला मिळत आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close