आपला जिल्हा

वाशी शहरालगत असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतात पडला सोनेरी दगड

वाशी — शहरालगत असलेल्या शेतात शूक्रवार दि.24 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान अचानक एक सोनेरी दगड पडल्याने तर्कवितर्क लढवले जात असून घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

वाशी येथील शेतकरी प्रभु माळी हे आपल्या शेतात सकाळी भाजीपाला काढत असताना अचानक सूऽऽसू आवाज करत त्यांच्या अंदाजे सहा फुटावर एक दगड पडला.त्यांनी भांबावलेल्या अवस्थेत इकडे=तिकडे पाहिले .शेतकर्‍यांने जवळ जाऊन निरीक्षण केले असता,पडलेला दगड सोनेरी रंगाचा असून त्या ठिकाणी खड्डा पडला असल्याचे त्यांनी तहसिलदार नरसिंग जाधव यांना फोनद्वारे कळविले.

तो दगड शेतकर्‍यांने अव्वल कारकून सचिन पाटील यांच्याकडे सुपूर्द केला असून उल्कापात असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले असून त्याचे वजन केले असता 2 किलो 38 ग्रॅम असल्याचेही सचिन पाटील यांनी सांगितले.पुढील तपासणीसाठी भु जल वैज्ञानिक उस्मानाबादला पाठविण्यात आला असून वरिष्ठ वैज्ञानिक बी.एम्.ठाकुर यांनी सांगितले की,हा दगड उल्कापातचा वाटतो,परंतु तपासणीनंतरच अनुमान काढण्यात येईल .घाबरण्याचे काही कारण नसून अवकाशात घडणाऱ्या घडामोडीतून असे उल्कापात पृथ्वीच्या कक्षेत आल्यामुळे असे घडत असते.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close