आपला जिल्हा

भोजगावात वाहून गेलेल्या पूलाने आणखी एक बळी घेतला, ग्रामस्थ संतप्त

गेवराई —  पाण्याच्या जबरदस्त प्रवाहात वाहून गेलेल्या पुलाच्या कठड्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या तरूणाचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवार ता. 26 रोजी उघडकीस आली. दरम्यान, आठवड्या आधीच एका शाळकरी मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाताना असाच जीवघेणी कसरत करावी लागली होती. तरीही, प्रशासनाला
पूल दुरूस्तीसाठी जाग आली नाही. दरम्यान ,भोजगाव ता. गेवराई येथील युवकाचा झालेला दुर्दैवी मृत्यू प्रशासनाच्या चालढकल व्यवस्थेचा बळी असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी गेवराई-शेवगांव राज्य मार्ग अडकून धरला. नागरिकांनी धोंडराई पुलावर ठिय्या आंदोलन सुरू करून सरकारला जाब विचारला आहे. ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, अशी जाहीर भूमिका आंदोलकांनी घेतल्याने राज्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.तालुक्यातील भोजगाव गावालगत असलेल्या अमृता नदीवर पुल वाहून गेल्याने, याच पूलाच्या कठड्यावरून नदी पार करताना गावातील एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार ता. 26 रोजी ९ वाजता घडली आहे. युवकाचा मृतदेह धोंडराई पुलाजवळ आढळून आला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन धोंडराई पुलावर आंदोलन सुरू केले. या पुलावरून याधी ही गावातील एका नागरिकांचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी नदी पार करण्यासाठी पुलच नसल्याने एका आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह

 शवविच्छेदनासाठी अक्षरश; नातेवाईकांना खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागली होती. हे विदारक चित्र असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. रविवारी पुन्हा या पुलावरून तरूण वाहून गेल्याची घटना घडली असून, अजून किती बळी गेल्यानंतर हा पूल करणार आहात ? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. भोजगाव गावालगत अमृता नदीवर पुल ऑक्टोबर २०१९ मध्ये पावसाळ्यात खचला होता. मात्र, प्रशासनाने लक्ष दिले नाही लोकप्रतिनिधींनी सदरील पुलाची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभाग तसेच प्रशासनाकडे मागणी केली होती. तरीही या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. जोपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. यानंतर या ठिकाणी आ. लक्ष्मण पवार, पोलीस, महसूल, तसेच संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी, या पुलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close