क्राईम

शेकटा ग्रामपंचायतीत मनरेगात भ्रष्टाचार; गटविकास अधिकाऱ्यांसह दोषींवर गून्हे दाखल करण्याची डाॅ.ढवळेची मागणी

बीड — गेवराई तालुक्यातील मौजे शेकटा ग्रामपंचायत अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात उपजिल्हाधिकारी रोहयो,तसेच मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड,गटविकास आधिकारी नरेगा कक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी केल्यानंतर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशावरून उपमुख्य कार्यकारी आधिकारी डी.बी. गिरी यांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीसमोर झालेल्या चौकशीत अनिरुद्ध सानप गटविकास आधिकारी, श्री.बी. आर. कुलकर्णी सहाय्यक लेखाधिकारी, वाघमारे एस.एस.ग्रामसेवक ,रामदास शेंबडे ग्रामरोजगार सेवक, ऑपरेटर देशपांडे हे 1 लाख 92 हजार 780 रूपये अपहार प्रकरणात दोषी आढळून आल्याचा अहवाल मुख्याधिकारी जिल्हापरिषद बीड यांना चौकशी समितीचे प्रमुख जोगदंड डी.डी., आरूण बुरांडे सहाय्यक लेखाधिकारी समिती सदस्य, श्रीमती कुटे स्वाती सकाअ नरेगा कक्ष समिती सदस्य यांनी दिला आहे.
मौजे शेकटा ता. गेवराई जि.बीड येथिल ग्रामपंचायत अंतर्गत मग्रारोहयोच्या कामात मजुरांची मागणी नसताना तसेच मजुरांच्या परस्पर शोषखड्डे कामात तसेच मयत 15 मजुर व शासकीय नोकरदार 5 लोकांना मजुर दाखवून शासकीय निधीचा अपहार करण्यात आल्याची तक्रार आप्पासाहेब खंडु महानोर ,ग्रामपंचायत सदस्य,शेकटा ग्रामपंचायत व राजेंद्र विष्णु महानोर रा. शेकटा ता. गेवराई जि.बीड यांनी केली होती. यावर चौकशी आधिकारी श्री.दिपक जोगदंड गटविकास आधिकारी,नरेगा,जिल्हापरिषद बीड यांनी 15 मयतापैकी केवळ एक साहेबराव काशिनाथ शेंबडे व शासकीय सेवेत कर्मचारी सुरेखा भागवत महानोर, ग्रामसेवक, पंचायत समिती गेवराई यांचेच जवाब घेऊन अपहार झाल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी आधिकारी यांना पाठवला आहे. परंतु तक्रारीत एकुण 16 मयत व 6 व्यक्ति शासकीय नोकरदार असल्याची तक्रार पुराव्यासह केल्यानंतर सुद्धा केवळ या भ्रष्टाचार प्रकरणात दोषींना वाचवण्यासाठी व प्रकरणातील गांभीर्य कमी करण्यासाठीच
मयत दत्तात्रय पांडुरंग शेंबडे ,धोंडाबाई रामभाऊ हाके ,मथुयाबाई सावळीराम शेंबडे ,महादेव काशिनाथ शेंबडे ,नामदेव महादेव शेंबडे ,नारायण रामभाऊ भारती ,फाताबाई बाबा पठाण ,धोंडीराम यादवराव माने ,कचराबाई धोंडीराम माने ,सुर्यभान यादवराव माने,ज्ञानोबा शिवराम साळवे ,चतुराबाई ज्ञानोबा साळवे ,सहाबाई संभाजी कुडुक ,हरीभाऊ भानुदास महानोर,विमल हरीभाऊ महानोर या मयत मजुरांचा तसेच शासकीय नोकरदार 1)बाळु रामनाथ माने 2)सुमित्रा धर्मराज गर्जे 3)अनुराधा विठ्ठल झेंडेकर 4)विठ्ठल प्रल्हाद शेंडेकर 5)शिवाजी बाबुराव पारेकर या पाच मजुरांचा
उल्लेख व तपासणी केलीच नाही व अहवालात सुद्धा उल्लेख नाही.
श्री. दिपक जोगदंड गटविकास आधिकारी (नरेगा)जिल्हापरिषद बीड यांनी मुख्य कार्यकारी आधिकारी यांची दिशाभूल करून खोटा अहवाल सादर केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी मुख्यमंत्री, प्रधान सचिव रोहयो मंत्रालय ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांना केली होती त्यानंतर डी. बी. गिरी उपमुख्य कार्यकारी आधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमुन चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशी अंती दोषीसिद्ध झाले आहेत.

गुन्हे दाखल करण्याची जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड, विभागीय आयुक्तांकडे डाॅ.गणेश ढवळेंची मागणी
शेकटा ग्रामपंचायतीत नरेगा गैरव्यवहार प्रकरणात मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी 2 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते त्या अनुषंगानेच विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी बीड यांना निर्देश दिले होते. शेकटा ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा अंतर्गत अपहार करण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने अखेर संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी बीड,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड, विभागीय आयुक्तांना केली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close