महाराष्ट्र

शेंबड्या पोराच्या खाल्ल्या मिठाला वमने जागले; कारवाईचा दबाव वाढताच पाय लाऊन पळाले

बीड — जगात मानसाशी प्रामाणिक असणाऱ्या अनेक प्राण्यांची उदाहरणं दिली जातात.पण शिरीष वमने यांनी शेंबड्या पोराने फेकलेला तूकडा खात इमानदारी ची नवी मिसाल निर्माण केली आहे. तांदळवाडी प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे सगळीकडे छी थू झाल्यानंतर कारवाई करण्याचं पाप आपल्या हातून घडू नये मालकाशी इमानदारी राखता यावी यासाठी दीर्घ रजा टाकून पळ काढला असल्याचं पाहायला मिळू लागला आहे.

तहसीलदार पदावर बसल्यानंतर डोळे झाकून मांजरा सारखं दूध पिण्याचा कार्यक्रम वमने यांनी सुरू केला होता. त्यामुळे जग आता आंधळ झाल आहे. मी काहीही केलं तरी माझं काय वाकडं होणार ? असा भ्रम त्यांना निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारत त्यांचे धान्य राशन दुकानदारांना हाताशी धरून गायब करण्याचा सपाटा लावला. वाळू गौण खनिज माफियांना हाताशी धरुन त्यातून पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला. हे धंदे अक्षरश: राजरोस सुरू आहेत. कट्टर जातीय वादाचा नमुना देखील त्यांच्या कामकाजातून पाहायला मिळाला. आदिवासी दलित पारधी कुटुंबाला बेघर करण्याचा त्यांचा प्रयत्न देखील समोर आला.सरकारी कामात त्यांनी नवा ट्रेण्ड निर्माण केला होता दिवसा शासकीय कार्यालय सुरू असतात हे सर्वश्रुत आहे पण तहसील चा कारभार रात्रीच्या काळात सुरू असल्याचं पाहायला मिळू लागलं.यावेळी वाळू व राशन धान्य माफियांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागली.वटवाघूळासारखी तहसील मध्ये बसून गोरगरिबांच्या न्याय हक्काची शिकार करत स्वतःची तुंबडी भरण्याचं काम केलं जाऊ लागलं. त्यातून गोरगरीब निराधार निराश्रित मंडळीना देखील अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम वमनेनं केलं.पण तांदळवाडीकरांनी राशन चा काळ्या बाजारात जाणारा पिक अप आरोपीसह पकडून पोलिसांच्या हवाली केला. या प्रकरणात आरोपी असलेल्या शेंबड्या पोरापूढे वमनेने गोंडा घोळत फेकलेला तूकडा खात इमानदारी ने जागण्याचा प्रयत्न करत कुत्र्याला ही लाजवेल अशी प्रामाणिक कामगिरी पार पाडली. या प्रकरणावर पडदा टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र जनतेचा दबाव वाढल्यानंतर आपल्या हातून कारवाईचं पाप घडू नये यासाठी दिर्घ रजा टाकून पळ काढण्यात धन्यता मानली. आता या प्रकरणात नवीन रुजू झालेले जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात. ज्याच्याकडे तहसीलदार पदाचा तात्पुरता पदभार येईल तो अधिकारी काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close