क्राईम

शिवसेनेच्या उप प्रमुखास मारहाणप्रकरणी बाळासाहेब गुंजाळास अटक

बीड — शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हनुमान जगताप यांना मारहाण प्रकरणी बाळासाहेब गुंजाळ यांना अटक करण्यात आली आहे . सदरील गुन्हा पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल असून यात दोन आरोपी अगोदरच अटक करण्यात आली आहेत . एल सी बी चे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी मोठ्या शिताफीने आरोपीस बेड्या ठोकल्या.
सदरील प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके करत आहेत .हनुमान जगताप यांना प्रचंड मारहाण केल्या प्रकरणी जिल्ह्यात खळबळ उडाली होती सदरील प्रकरणी तपास होऊन मुख्य सूत्रधार शोधावा अशी मागणी जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी केली होती . सदरील प्रकरणी आणखी काही आरोपी मोकाट असल्याचे देखील बोलले जात आहे .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close