क्राईम

धारूर घाटात सिमेंट घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला, चालक ठार

धारूर — धारूर घाटात सोलापूरहून परभणी कडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक धारूर घाटातून जात असताना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दरीत कोसळला या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर हुन परभणी कडे सिमेंट घेऊन जाणारा ट्रक क्र. एमएच 12 एनएक्स 4090 धारूर घाटातून जात असताना चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्यामुळे घाटातील अवघड वळणावर कठडा तोडून दिडशे ते दोनशे मिटर खोल दरीत कोसळला. यात चालक पैंगबर पटेल वय चाळीस वर्ष गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन पाटील तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहचले. चालकास धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी चालकाला तपासून मृत घोषित केले.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close