क्राईम

मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेस मारहाण; घरातून दिले हाकलून

केज — मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पती व सासूने मानसिक व शारीरिक छळ करत घरातून हाकलून दिल्याची घटना आणेगाव येथील विवाहिते सोबत घडली असून‌ याप्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आणेगाव माहेर असलेल्या जयश्री मधुकर कदम हिचा विवाह सन २००५ साली इटकुर ता. जि. उस्मानाबाद येथील मधुकर कुंडलिक कदम याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही वर्षे झाल्यानंतर तुला मुलबाळ होत नाही असे म्हणत पती मधुकर कदम व सास कलाबाई कदम यांनी जयश्री हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घराबाहेर हाकलून दिले. जयश्री हिने माहेरी आणेगाव येथे येऊन युसुफवडगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती मधुकर कदम, सासू कलाबाई कदम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अंगद पिंपळे हे करीत आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close