क्राईम

एसपी साहेब साठ लाखाचा गुटखा पकडला; माफिया कधी पकडणार?

बीड — जिल्ह्यात राजकीय वरदहस्त असलेल्या माफियांचा गुटख्याचा धंदा राजरोस सुरू आहे. एसपीच्या विशेष पथकाने घोडका राजुरी येथील एका गोडाऊवर छापा टाकून साठ लाखाचा गुटखा जप्त केला असला तरी प्रत्यक्षात मात्र तो कोट्यावधी रुपयांचा असल्याचं सांगितलं जात आहे. या कारवाईत ट्रक व टेम्पो पकडण्यात आला. दोन चालकांनाही ताब्यात घेण्यात आले. मात्र राजरोसपणे ‘मुळे’ नावाचा माफिया पोलिसांच्या देखत या ठिकाणावरुन निघून जाण्यात यशस्वी ठरला. अर्थातच पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी व त्यांचे पथक या माफियाच्या मुसक्या बांधण्यात कितपत यशस्वी होईल हे सांगणे अवघड झाले आहे.

परळी रोडवर घोडका राजुरी जवळ गोदामात गुटखा असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली.मात्र पिंपळनेरच्या ‘बाळा ‘(साहेब)ला दूर्देवाने मिळू शकली नाही. वाळू माफिया यांसोबत फोटोसेशन करण्याचा ‘आघाव ‘ पणा करण्यातच सहाय्यक पोलीस निरीक्षक मशगुल राहिले. रोज होत असलेल्या सत्कार समारंभामुळे हरखून गेलेल्या आघावांना सोन्याच्या पावलाने ‘लक्ष्मी’येणार असल्याचे स्पष्ट दिसू लागले. मग ते वाळू असो की गुटखा माफियांना आश्रय देऊन असो! विशेष पथकाने या गोदामावर सकाळच्या वेळी छापा टाकला. यावेळी ट्रक व टेम्पोतून गुटखा उतरलला जात होता. विशेष पथकाच्या पोलिसांनी कारवाई करत दोन वाहन चालकांना अटक केली साठ लाखाचा गुटखा जप्त केल्याच दाखवलं. गोदामामध्ये दीड कोटी रुपयांचा गुटका असल्याचं सांगितलं जात असलं तरी पोलिस दप्तरी मात्र याची नोंद होऊ शकली नाही‌. विशेष पथकाने ट्रक टेम्पो त गूटखा नेऊन पिंपळनेर पोलिसांच्या हवाली केला त्यावेळी त्यांना या घटनेची माहिती झाली. पोलिसांची ही कारवाई चालू असताना गुटका माफिया मुळे हा या ठिकाणी हजर असल्याचं सांगितलं जात आहे तो राज रोसपणाने पोलिसां समोरून निघून गेला असल्याचे देखील आता सांगितलं जाऊ लागला आहे. हा माफिया पोलिसांनीच आज पर्यंत पोसला आहे. पेठ बीड पोलीस ठाण्याचा कारभारी असलेल्या पाटलाने देखील यापूर्वी कारवाई केली होती त्यावेळी चक्क पोलिस ठाण्यातून छोटा हत्ती या माफिया गूटख्या सह घेऊन गेला होता. पाटील मात्र टाळ्या वाजवत बसल्याचं जनतेनं उघड्या डोळ्यानं पाहिलं होतं‌. विशेष म्हणजे यामुळे नावाच्या माफियाच्या नावे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. तो राजरोस बीड शहरात फिरतो मात्र पोलिस त्याला पकडू शकले नाहीत. राजकीय वरदहस्त हादेखील त्याचा प्लस पॉइंट आहे. त्यामुळेच इतर राज्यातून बीडमध्ये गुटका मागवला जातो. इतर जिल्ह्यांमध्ये देखील सप्लाय केला जातो. पण कोरोना काळात सतर्क असलेल्या राजा रामास्वामीच्या पोलिसांना रस्त्यावर फिरणारे सर्वसामान्य दिसायचे पण गुटका व वाळूच्या जाणाऱ्या गाड्या कधीच दिसल्या नाहीत. त्यावेळी राजा रामास्वामी ची व त्यांच्या यंत्रणेची धृतराष्ट्राला सारखी परिस्थिती होऊन बसल्याचे चित्र जिल्ह्याला पाहायला मिळालं.
मुळेला पकडण्याची नैतिकता राजा रामास्वामी दाखवतील काय ?
एसपी साहेब… तुमच्या पथकाने केलेल्या कामगिरीबद्दल प्रत्येक स्तरातून अभिनंदन होत आहे. पण खरंच कोट्यावधी रुपयांची दररोज उलाढाल असलेल्या या माफियांची पाळंमुळं खणून काढण्याची नैतिकता आपण आता तरी दाखवणार काय ? एवढ्या मोठ्या झालेल्या कारवाईतून देखील संशयाच्या भोवर्‍यात पोलिस सापडले आहेत त्यांना बाहेर काढणार काय? पेठ बीडच्या पाटलांसारख आपण देखील हात चोळत तर बसणार नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close