राजकीय

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल

गांधीनगर — गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर आता सध्या गुजरातमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानं अनेकांना धक्काच बसला होता. त्यानंतर आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा करण्यात आली आहे.गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.
आनंदीबेन पटेल आणि पंतप्रधान मोदी यांचे जवळचे सहकारी म्हणून भूपेंद्र पटेल यांची ओळख आहे. अहमदाबादमधील घाटलोहिया या मतदार संघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांना धक्का देत त्यांची निवड करण्यात आली आहे.
गुजरातच्या नवीन मुख्यमंत्री पदासाठी कॅबिनेट मंत्री मनसुख भाई मांडविया, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला गुजरात प्रदेश भाजपाध्यक्ष सीआर पाटील, लक्षद्वीप लेफ्टनंट राज्यपाल प्रफुल्ल खोडभाई पटेल या पाच नावांची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, अखेर भूपेंद्र पटेल यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
दरम्यान, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठे फेरबदल केल्याचं पहायला मिळतंय. भाजप कार्यकारणीची बैठक पार पडली . त्यावेळी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री बदलाचा गुजरातच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो, यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close