आपला जिल्हा

आभाळ माया…! तालुक्यातील “परिसंस्था” झाल्या ओव्हर फ्लो..! धोका कायम ! गोदा काठ, पत्रा – मातीच्या घरात राहणारी माणसे झाली भयभीत

गेवराई —  धो.. धो… पडलेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले, ओढे, पाझर तलाव, खदान, गबार ओसंडून वाहत असून, या आभाळ मायेने, “परिसंस्था” ओव्हर फ्लो झाल्या आहेत. पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलाव ही फुटलेत. हजारो क्युसेक पाणी वाया जात असून, अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे. अजूनही धोका कायम आहे. पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, काही मंडळात चार वेळा अतिवृष्टी झाली आहे. पावसाळी मोसमात 675 मिमी. एवढी सरासरी आहे. 8 सप्टेंबर पर्यंत 877 मिमी. पाऊस पडला आहे.

दरम्यान, प्रशासनाने “अलर्ट” रहा, अशा कोरड्या सूचना करून जबाबदारी पार पाडली असली तरी गोदाकाठची गावे आणि पत्रा – मातीच्या घरात राहणारी माणसे भयभीत झाली आहेत.

एकाच आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेत. पाण्याच्या जबरदस्त प्रवाहात पाच तलाव फुटलेत. गेवराई शहरा जवळचा गोविंवाडी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. या तलावाच्या सांडवा भिंतीच्या चादरीवरून वाहणारे पाणी बघण्यासाठी नागरिक गर्दी करू लागलेत. दहा मंडळात 877.55 मिमी.पाऊस झाला आहे. वार्षिक
सरासरी ओलांडून पाऊस पुढे जातो आहे. दहा मंडळात
झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून, नदी, नाल्यांना आलेल्या पूराने अनेक पूल वाहून गेले आहेत. चार चार वेळा मंडळात मुसळधार पाऊस पडत असून, अतिवृष्टी झाली आहे. माती वाहून गेली आहे.
रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. उमापूर – मालेगाव रस्त्यावरच्या पूलाचा अर्धा भाग वाहून गेला आहे. खोपटी तांडा तलावाला भगदाड पडले आहे. काही तलावांना तडे गेले आहेत. काही तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे, संभाव्य धोका आणि अडचणीत वाढ होईल की काय, अशी भिती व्यक्त केली जात आहे. नागरीकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. अस्मानी संकट उभे राहील्याने
ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दहा मंडळातली आकडेवारी एकत्र केली असता, एकुण पावसाचे टक्केवारीतले प्रमाण भयभीत करणारे आहे. तीन दिवसांपासून परिसरातील
विहिरी व इंधन विहिरीतून आपोआप पाणी वाहत आहे. मातीची घरे कोसळून पडू लागली आहेत. मजबूत घरात ही पाणी पाझरत असल्याचे चित्र आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close