आपला जिल्हा

जिल्हयात अतिवृष्टीमुळे नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित

मदतीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक 02442-222604 वर संपर्क साधण्याचे आवाहन

बीड —-जिल्हयात दिनांक 05 सप्टेंबर 2021 पासून नियमित पाऊस पडत असून बीड ,पाटोदा, आष्टी, गेवराई, अंबाजोगाई ,शिरूर कासार आणि बीड या तालुक्यात 65 मि.मि.पेक्षा जास्त अतिवृष्टी झालेली आहे. तसेच जिल्हयात अतिवृष्टीमध्ये वडवणी तालुक्यात बंधा-यात पुरामुळे 3 पुरूष वाहून गेले व मयत झाले असून बीड तालुक्यात 1 महिला भिंत पडून मयत झाली आहे.

बीड जिल्हयात 11 तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मधील आपत्ती व्यवस्थापन निवारणार्थ जिल्हाधिकारी बीड येथील कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केलेला आहे. त्याचा संपर्क क्र 02442-222604 असा असून मदतीसाठी जनतेने कृपया या क्रमांकाशी संपर्क साधावा. तसेच आपल्या सभोवताली निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास तसेच नदी
काठी राहणार्‍या जनतेने पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वरील क्रमाकांशी तात्काळ संपर्क साधावा
आणि सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close