आपला जिल्हा

करुणा मुंडे प्रकरण;गाडीत पिस्तूल ठेवले की होते तपास सुरू ?

बीड — सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कथित आरोप केलेल्या करुणा मुंडे- शर्मा यांच्या वाहनामध्ये पिस्तूल सापडल्या प्रकरणी चालक दिलीप पंडित यांच्यावर गुन्हा दाखल केला असून गाडीत काहीतरी वस्तू ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वस्तू फेकणारी ती व्यक्ती कोण?याचा तपास लावला जात असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षक आर राजा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

करुणा मुंडे परळीत आल्यानंतर आल्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र पत्रकार परिषदेत प्रकरणाची इत्यंभूत माहिती देत असताना त्यांची हतबलता स्पष्ट दिसून आली. पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान करुणा मूंडे परळीत आल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी करुणा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत एट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार करुणा मुंडे यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा तर त्यांचे वाहन चालक दिलीप पंडित यांच्या विरोधात विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्या व्हायरल व्हिडिओचा अजून तपास नाही —

रविवारी जेव्हा करुणा मुंडे परळी दाखल झाल्या तेव्हा अनेक महिला कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी करुणा मुंडे यांच्या वाहना भोवती गर्दी केली होती. याच दरम्यान करुणा मुंडे यांच्या वाहनाची डीगी खोलून काहीतरी वस्तू गाडीत फेकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. गाडीत वस्तू टाकणारी ती व्यक्ती कोण? याचे उत्तर बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा देऊ शकले नाहीत. पिस्तूल कुठून आली की ती कोणी टाकली याचा तपास सुरू असल्याचेही राजा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
करुणा मुंडे या रविवारी परळी मध्ये आल्यानंतर पोलिसांनी करुणा मुंडे यांच्या वाहनाची तपासणी केली यामध्ये पोलिसांना पिस्तूल आढळून आले होते परंतु या प्रकरणात तथ्य नसून मला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवले जात असल्याचे देखील करुणा मुंडे शर्मा यांनी म्हटलेले आहे.
करुणा मुंडे प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष —
रविवारी दिवसभर करुणा मुंडे शर्मा प्रकरणात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनेच्या नंतर 24 तास उलटून देखील ती पिस्तूल कोठून आली.? ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याबाबत एवढी घाई कशासाठी केली? याचे समाधानकारक उत्तर पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडून मिळालेले नाहीत. यामुळे करुणा मुंडे- शर्मा प्रकरणाच्या तपासाकडे संशयाने संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close