क्राईम

करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बीड –. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे रविवारी परळी येथे आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता करुणा शर्मा यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले तर त्यांच्यासोबत असलेल्या मोरे नावाच्या इसमास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

करुणा शर्मा यांना अंबाजोगाईच्या न्यायालयात हजर करत असताना वंचित बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत करुणा शर्मा यांना समोरच्या व्यक्तीची जात कशी माहिती झाली असा प्रश्न उपस्थित करत. हे षड्यंत्र असल्याचा आरोप केला.

करुणा शर्मा यांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माझ्यावर झालेल्या अन्यायाचे पुरावे माध्यमांसमोर मांडणार असल्याचं फेसबुक लाईव्ह मधून जाहीर केलं होतं. त्यानुसार त्या परळी मध्ये दाखल झाल्या. वैद्यनाथाचे दर्शन घेत असताना त्यांना महिलांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. पोलिसांनी त्यांच्या गाडीचे झडती घेतली असता अवैधरित्या बाळगलेले पिस्तूल पोलिसांना आढळून आले. या घटनेने परळीत खळबळ माजली. दरम्यान पोलिसांनी नगरपालिका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला.दरम्यान आज सोमवारी त्यांना न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. तर त्यांच्या सोबत असलेला मोरे नामक इसमास एक दिवस पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

स्वतः मांडली बाजू

अंबाजोगाई न्यायालयात हजर केले असता करुणा शर्मा यांनी स्वतः च आपली बाजू मांडली. तर एड. गलांडे यांनी कायदेशीर बाजू मांडली.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close