आपला जिल्हा

बाप लेका सह भाच्याचा पूराच्या पाण्यात बूडून मृत्यू

वडवणी — रात्री झालेल्या पावसामुळे वडवणी तालुक्यातील नद्यांना पूर आला. पिंपरखेड येथील नदीला आलेल्या पुरामध्ये तिन जण वाहून गेले. यातील दोघांचा मृतदेह देवडीच्या बंधाऱ्यात सापडले, तर एकाला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. ही दुर्देवी घटना सोमवारी दुपारीच्या दोनच्या सुमारास घडली. ऐन पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
जोरदार पावसामुळे पिंपरखेड च्या नदीला पूर आला ‌ या नदीच्या पुरामध्ये अजय मधूकर खळगे 23 वर्ष व भाचा अजय यादव उजगरे 21वर्ष हे दोघे वाहून जाऊ लागले. हे पाहून मधुकरराव खळगे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मुलगा अजय आणि भाचा अजय हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.मात्र मधुकर खळगे हे पाण्यात अडकले.कांही वेळानंतर त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. परंतु पुराच्या पाण्यातील भोवऱ्यामध्ये अडकल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. त्यांना रूग्णालयामध्ये घेवून गेले असताना त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याचे काम तातडीने करण्यात आले.ऐन पोळ्याच्या सणादिवशी ही दूर्घटना घडल्यामूळे शोककळा पसरली गेली.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close