क्राईम

परळी: करुणा शर्मा सह अन्य एकावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, सोमवारी न्यायालयात हजर करणार

परळी — सध्या करूना धनंजय मुंडे विषय राज्यभर चर्चीला जात आहे. त्यांनी रविवारी परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे सोशल मीडिया वरून जाहीर करत खळबळ उडवून दिली होती. दरम्यान दुपारी दोन नंतर परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात करुणा मुंडे दाखल झाल्या तिथे मंदिर परिसरातील महिलांबरोबर बाचाबाची झाल्याने शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मा विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले असून सोमवारी अंबाजोगाई येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

परळी शहरांमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी रविवारी पोलीस प्रशासनाने शहर व पत्रकार परिषद होणार असलेल्या वैद्यनाथ मंदिर परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. विशेषतः महिला पोलीसांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. येथील शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, करुना शर्मा या वैद्यनाथ मंदिर परिसरात पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या असता विशाखा रविकांत घाडगे व गुड्डी छोटूमियाँ तांबोळी या महिलेबरोबर त्यांची बाचाबाची झाली. यावेळी करुणा शर्मांनी दोघींना तुम्ही पैसे घेऊन इथे आला असल्याचे म्हणत लाथा बुक्यानी मारहाण केली व जीवे मारण्याच्या उद्देशाने गुड्डी तांबोळी या महिलेस चाकू मारला. यामध्ये ही महिला जखमी झाली आहे. उपचारासाठी आंबेजोगाई येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीवरुन करुणा शर्मा व अरुण मोरे (मुंबई) यांच्यावर भादवि 142/ 2021 कलम 307, 323, 504, 506-34 नुसार अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक सुनील जायभाये हे करत आहेत. दरम्यान करुणा शर्मा व अरुण मोरे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी दि.6 सप्टेंबर रोजी आंबेजोगाई येथील न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close