क्राईम

बलात्कारातून गरोदर राहिलेल्या अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याचा प्रयत्न

केज –शेळ्या सांभाळणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच भावकीतील चुलतभावाने बळजबरीने बलात्कार केला .या दुर्दैवी घटनेनंतर मुलगी गर्भवती राहिली. ही माहिती होताच नराधम चुलत भावाने पीडित मुलीला त्यांच्याच शेतातील विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यातील माळेवाडी येथे घडली . या गंभीर घटनेची माहिती नातेवाईकांसह पीडितेने केज पोलिसात दिल्यानंतर नराधम चुलत भावा विरुद्ध बलात्कारासह जिवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी अद्दाप फरार आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील माळेवाडी येथील गावात शेळ्या सांभाळणार्‍या 16 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या भावकितील नात्याने चुलत-चुलत भाऊ असलेल्या नराधमाने तीन महिन्या पूर्वी म्हसोबचे शेत नावाने ओळखल्या जात असलेल्या शिवारात बळजबरीने बलात्कार केला. यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती होताच तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा हा दुसरा तिसरा कुणी नसून तिच्याच भावकितील आहे. नात्याने तो तिचा चुलत चुलत भाऊ आहे.
याची माहिती अल्पवयीन मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितल्या नंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून दि. 2 सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात त्या नराधमाचा विरुद्ध फिर्याद दिली त्या नुसार 2 सप्टेंबर रोजी त्याच्या विरुद्ध भा दं वि 376, 376(2) (टी) (एन) 307 यासह बाललैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 4, 6, 8, 10 नुसार बलात्कार करून खून करण्याचा प्रयत्न करणे व बाल लैंगिक अपराधा पासून बालकांचे संरक्षण म्हणचे पोक्सो नुसार गुन्हा दाखल झाला आहे. प्रभारी ठाणे अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी गुन्हा दाखल करून प्रभारी ठाणे प्रमुख शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी व पिंक पथकाच्या रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close