क्राईम

कार व मोटारसायकलच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू तर दोन जखमी

माजलगाव — मोटारसायकल व कारच्या समोरा समोर झालेल्या धडकेत एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना माजलगाव परभणी रोडवर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात गणेश वसंत डांगे वय 18 वर्षे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वसंत डांगे वय 42 वर्ष, अविनाश डांगे वय 14 वर्ष एक गंभीर जखमी झाले आहे. हे तिघे बापलेक कामानिमित्त माजलगाव येथे आले होते. कामकाज आटोपल्यानंतर रोशनपूरीला मोटारसायकल वरून जात असताना परभणी रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ कारची क्र एम एच 14,इएम 92 व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. तसेच जखमी झालेल्या वसंत डांगे व अविनाश या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close