राजकीय

‘या’ चार नावावर राज्यपालांचा आक्षेप; नाव वगळून राज्यपाल नियुक्त आमदार ठरणार ?

‍मुंबई — विधानपरिषदेसाठी १२ आमदारांची नियुक्तीवरून सध्या राज्यात वाद सुरू आहे. महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.मात्र, या यादीतील चार नावांवर आक्षेप घेण्यात आला असून ती नावे बदलल्यास यादी फायनल होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांची लवकर नियुक्ती करावी अशी मागणी वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आग्रह धरत नाहीत, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नेते भेट घेणार होते. मात्र, आता ठाकरे यांच्याऐवजी अन्य नेते भेट घेणार आहेत..
राज्यपाल नियुक्त जागांबाबत नियुक्तीचा वाद कोर्टापर्यंत गेला. मात्र आता ही १२ जणांच्या नावाची यादी काही दिवसांत जाहीर होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते.
मंत्रीमंडळाने पाठविलेल्या १२नावांमधील काही नावांवर कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सचिन सावंत, नितीन बानुगडे आणि यशवंत भिंगे यांच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे.१२ जणांच्या यादीतील आक्षेप घेतलेली नाव वगळण्याची तयारीही महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
राज्यपालांसोबत होणाऱ्या चर्चेत जर राज्यपालांनी १२ नावांपैकी काही नावांवर आक्षेप आहे असे सांगितल्याचे समजते.मात्र विधानपरिषद आमदारांची नियुक्ती वर महाविकास आघाडी या नावांवर ठाम राहिली तर राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष पुढील काळात सुरू राहील.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close