आपला जिल्हा

बीडकरांनो तुमच्या भागात होणारा विकास अडवणार्‍यांना जाब विचारा – नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर

पत्रकार परिषदेत पुरावे सादर करून नगराध्यक्षांनी विरोधकांची केली पोलखोल

बीड — विकासाची नवी संकल्पना घेऊन या पाच वर्षांच्या काळात आपण केवळ बीडच्या जनतेला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करून मोठा निधी उपलब्ध करून घेतला, अण्णांच्या माध्यमातून अमृत अटल आणि भुयारी गटार योजना मंजूर करून त्याचेही काम सुरू केले, झालेल्या कामानंतर नागरिकांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी विविध योजनेतून निधी मंजूर करून घेतला मात्र सुडाचे राजकारण करणार्‍या स्थानिक आमदारांनी पालकमंत्री यांच्या कडून नगर पालिकेच्या संविधानिक हक्क हिसकावून घेत बीड शहरात होणारी विविध विकास कामे अडवली आहेत,ही बाब आता जनतेने लक्ष्यात घेऊन जाब विचारायला हवा असे परखड मत नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषेदेत पुराव्यानिशी मांडले आहेत.
बीड नगरपालिकेची निवडणूक होऊन आता पाच वर्षे पूर्ण होत आहेत या पाच वर्षाच्या काळात निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान बदलत्या बीड शहराच्या संकल्पना आम्ही बीडच्या नागरिकांसमोर मांडल्या होत्या या सर्व विकासकामांचे प्रस्ताव तयार करून कायमस्वरूपी रस्ते नळ योजना आणि भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी तत्कालीन आमदार आणि मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला यामध्ये भुयारी गटार योजना आणि अमृता टोल योजनेचे काम जवळपास पूर्णच होत आले आहे याच बरोबर बीड शहरातील 16 नवीन डीपी रस्त्यांसाठी 88 कोटी रुपये मंजूर करून घेतले शहराच्या वैभवात भर घालणार्‍या विकासकामात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत बीडकरांनी मोठ्या विश्वासाने विरोधकांना निवडून दिले त्याच विरोधकांनी कुटील डाव खेळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे दिलेल्या वचनानुसार विविध योजनेच्या माध्यमातून निधी मंजूर करून घेतला आहे मात्र ही कामे जर झाली तर आता येणार्‍या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्याला जनता मागे फेकेल या भीतीने स्थानिक आमदारांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून बीड नगरपालिकेला आलेला प्रत्येक निधी अडवण्याचा प्रयत्न केला आहे गोरगरिबांना मिळणार्‍या शेकडो घरकुलांची कामे याच आमदारांनी अडवून ठेवले आहेत तसेच शासनाकडून मिळणार्‍या विविध योजना राबवण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता याबाबत 30 जुलाई 2019 रोजी अवर सचिव यांचे पत्र देखील मिळाले होते मात्र हे काम होऊ नये म्हणून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे एवढेच नव्हे तर स्थानिक आमदारांनी अजूनही दुसरे उपद्व्याप सुरू केले आहेत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेची कामे सात कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मात्र कारण नसताना पालकमंत्र्यांना हाताशी धरून आमदारांनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहे एवढेच काय तर बीड जिल्ह्यातील 3 नगरपालिकांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात त्यातही आठ कोटी रुपयांची कामे होणार होती बीड जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन चर्चा करून ही कामे नगरपालिकेने करावी असे पत्रही दिले होते मात्र 2 फेब्रुवारी 2019 ला हा निर्णय बदलण्यात आला णि आमदाराच्या सूचनेवरून तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले तसेच चालू वर्षी दलित वस्ती ची कामे रखडून ठेवले आहेत आतापर्यंत बीड जिल्ह्यात अनेक पालक मंत्री झाले आहेत मात्र त्यांनी आपल्या पदाचा वापर करून कधीही अशी अडवणूक केली नाही मात्र सध्याच्या पालकमंत्र्यांनी काही ठराविक नगरपालिकेची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत याबाबत आश्चर्य वाटते आहे बीड शहरासाठी एकूण 21 कोटी रुपयांची विकासकामे जाणीवपूर्वक राखून ठेवण्यात आली असून येवला नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण केले जात आहे नागरिकांच्या अडचणी आणि गरजा लक्षात घेऊन बीड नगरपालिकेने आपल्या फंडातून ही कामे करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता मात्र त्यातही अडथळा आणण्याचे काम होऊ लागले आहे शहरात विविध 21 कामे अत्यावश्यक आहेत ती कामे नगरपालिकेने आपल्या अर्थसंकल्पात मंजूर केली आहेत. 17 कोटी 50 लाख रुपयांची ही कामे मंजूर असून त्यातील आठ कोटी 21 लाखाची कामे आम्ही तातडीने पूर्ण करणार होतो मात्र यातही स्थानिक आमदाराने अडथळा आणला आहे. वैशिष्टपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान मंजूर झालेल्या बीड शहरातील जुना मोंढा भागातील अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम करणे, शहरातील बालेपीर भागातील आघाव, राख यांच्या घरापासून ते सानप विद्यालयापर्यंत रस्ता, नाली बांधकाम करणे. वार्ड क्र.11 बालेपीर भागातील मामू गल्ली ते जायकवाडी भिंती पर्यंत रस्ता व नाली बांधकाम, मोमीनपूरा भागातील जी.एन.फंक्शन हॉल ते आदित्य कॉलेज नाथापूर रोड पर्यंत रस्ता व नाली बांधकाम करणे. स्वराज्य नगर भागातील रस्ता व नाली बांधकाम, शिवाजी नगर भागातील रस्ता व नाली बांधकाम तसेच प्रभाग क्र.4 मधील सिमेंट काँक्रीड रोड व नाली बांधकाम जे लाटे यांचे घर ते सार्वजनिक शौचालय, बबन रेगुडे यांचे घर ते दिलीप कांबळे यांच्या घरापर्यंत नागोबा गल्ली, प्रभाग क्र.4 मध्ये आसाराम जागदंड यांचे घर ते कालिदास जोगदंड यांच्या घरापर्यंत, वीरशैव कॉलनीतील सिमेंट काँक्रीट रस्ते व नाली बांधकाम, वार्ड क्र.4 मधील चंद्रकांत कदम यांचे घर ते आंबेडकर सभागृहापर्यंत, दत्ता खडके यांचे घर ते पेठ बीड पोलीस स्टेशन सिमेंट रस्ता व नाली बांधकाम, समाधान वंजारे यांचे घर ते राजेश कोकाटे यांच्या घरापर्यंत, हनुमान मंदीर रोड, आकाशवाणी जवळील काळे यांच्या घरापासून बुरांडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता व नाली बांधकाम, हिरामण गायकवाड यांचे घर ते कांबळे यांच्या घरापर्यंत (रेणूका नगर), प्रभाग क्र.3 मध्ये तीन रत्यांची कामे व नाली बांधकाम तसेच प्रभाग क्र.2 मध्ये सहयोगनगर भागातील पाच ठिकाणच्या रस्त्यांची कामे व नाली बांधकाम, प्रभाग क्र.13 मधील (माने कॉम्प्लेक्स परिसर) तीन गल्लीतील रस्ते व नाली बांधकाम, प्रभाग क्र.22 मध्ये धांडे नगर ते प्रितम संकुल शिवसृष्टी नगर ते शंभूराजे नगर रस्ता व नाली बांधकाम करणे, प्रभाग क्र.24 मधील अंकुशनगर येथील स्मशानभूमी ते लोढा नगरी सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे ही कामे झाली असती तर अनेक भागातील नागरिकांच्या समस्या सुटल्या असत्या. आता नवीन जिल्हाधिकारी यांना भेटून आम्ही याबाबत निवेदन सादर केले असून शहरातील सर्वच नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली आहे. सध्या बीड शहरात पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेअंतर्गत जागोजागी कामे पूर्ण झाली असून या कामामुळे शहरातील काही रस्ते खराब झाली आहेत, नागरिकांना अडचणी येऊ लागल्या आहेत हे लक्षात घेऊन बीड नगरपालिकेने ही कामे करण्यास सुरुवात केली होती मात्र नगरपालिकेच्या संविधानिक अधिकाराचा विचार न करता जाणीवपूर्वक खोडा घातला गेला आहे. आपल्या अधिकाराचा वापर करून सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 1/ 2019- 22 अन्वये अत्यावश्यक कामे नगरपालिका करू शकते म्हणूनच त्यासाठी आम्ही वीस कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती मात्र ही कामे झाली तर आपली किंमत कमी होईल या भीतीने स्थानिक आमदारांनी ठिकाणी अडवणूक सुरु केली आहे, याबाबत जनतेनेच आता निवडून दिलेल्या आमदाराला सार्वजनिक प्रश्न उपस्थित करून विकास कामे अडवल्याबद्दल जाब विचारला पाहिजे असे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांचा समाचार घेतला यावेळी डॉ योगेश क्षीरसागर व पालिकेचे सभापती,नगरसेवक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close