आपला जिल्हा

रवींद्र जगताप यांना दिलासा: न्यायालयाच्या अवमाननेची प्रक्रिया केली रद्द

बीड — उच्च न्यायालयाच्या आदेशाने नरेगा घोटाळ्यात कारवाई न केल्याचा आरोप ठेवत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना बदलीला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी त्यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला असून त्यांच्याविरोधात सुरू असलेली न्यायालयाच्या अवमानना प्रक्रिया रद्द केली आहे. तसेच ओढलेली ताशेरे निकाल पत्रातून वगळण्यात आले आहेत
जिल्ह्यात झालेल्या नरेगा घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही असे म्हणत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश दिले होते. नरेगा घोटाळाप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास राहिला नाही तसेच जगताप यांनी हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. याबरोबरच न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने रवींद्र जगताप यांची बदली देखील करण्यात आली होती.
याप्रकरणी रवींद्र रवींद्र जगताप यांनी उच्च न्यायालयात या आदेशाचा पुनर्विचार करावा व अवमान प्रक्रियेतून दिलासा द्यावा यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान जगताप यांच्या वकिलांनी रवींद्र जगताप यांच्यावर कोरूना नियंत्रणाची जबाबदारी होती. अधिकाऱ्यांचा असलेला तुटवडा या बाबी या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्याचा किंवा कोणाला वाचविण्याचा जगताप यांचा हेतू नव्हता असे प्रकर्षाने मांडले. जगताप यांचे विधिज्ञ व्ही आर धोर्डे यांचे म्हणणे ग्राह्य धरत न्यायालयाने अवमान प्रक्रियेतून जगताप यांना दिलासा दिला असून नोटीस रद्द केली आहे.
तर ‘जिल्हाधिकाऱ्यांनी ‘कव्हर अप मिशन ‘ सुरु केले आहे, हे न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण देखील आदेशातून काढून टाकण्यात आले आहे. सरकारने जगताप यांना सरकारी धोरणानुसार नियुक्ती द्यावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे रवींद्र जगताप यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close