क्राईम

अंबाजोगाई: धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

अंबाजोगाई — वराह चोरीचा जाब विचारल्यानंतर झालेल्या वादावादीत 30 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना वडारवाडा परिसरात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत.
शहरातील वडार वाडा परिसरातील काहीजण वराह पालनाचा व्यवसाय करतात. रवी धोत्रे या तरुणाची काही वराह चोरीला गेली असल्याची माहिती मिळाली यावरून संशयिताच्या घरी जाब विचारण्यासाठी हा तरूण गेला असता यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. शेवटी रवी हा घरी निघून आला. काही वेळानंतर मोटारसायकलवरून आलेल्या माणसांनी सुरुवातीला चर्चा केली बाचाबाची झाली त्यातील एका तरुणाने आपल्या हातातील धारदार शस्त्राने रवी याच्यावर वार केले. भर दुपारी पाऊस सुरू असल्यामुळे या भागातील सर्व लोक घरात बसलेले होते. तर रस्त्यावर हा थरार सुरू होता. या हल्ल्याची माहिती रवी धोत्रेच्या नातेवाईकांना समजल्यानंतर ते देखील घराबाहेर आले पुन्हा दोन्ही गटात मारामारी झाली या घटनेत दोन जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रवी धोत्रे याची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close