आपला जिल्हा

गेवराई तालुक्यात  जोरदार पाऊस,अनेक गावांना पाण्याचा वेढा ; काही मंडळात अतिवृष्टी

तालुक्यातील परीसंस्था ओसंडून वाहू लागल्याने नदी नाल्यांना आलाय पूर

गेवराई —  तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून, सोमवार ता. 30 रोजी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. परीसरातील काही मंडळात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील परीसंस्था ओसंडून वाहू लागल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी पिकांचा मोठे नुकसान झाले असून, पिके पाण्याखाली गेल्याने शेत पिकांना मोठा फटका बसला आहे.

रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले, ओढयांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. दरम्यान गोदावरी नदीवर असलेला हिरडपुरी बंधारा तुडूंब भरल्याने या बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघण्यात आले असून गोदावरीला पूर आला आहे. सोमवारी रात्रभर आणि मंगळवार ता. 31 रोजी दिवसभर
पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरीसह, उपनद्या, नाले
दुथडी भरुन वाहू लागलेत. गोदावरी काठी असलेल्या राजापूरला पाण्याने वेढा पडला आहे. मंगळवार ता. 31 रोजी दु 12 पर्यंत गावाचा संपर्क तुटलेला होता. उमापूर – माटेगाव रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.
राहेरी ता. गेवराई
जवळच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने तलवाड्याकडे येणारा रस्ता दुपारपर्यंत बंद होता.
रात्रभर सुरु असलेल्या जोरदार पावसाने गोदावरी नदीत पाण्याची आवक मोठ्या क्षमतेने वाढली आहे. दरम्यान, या नदीवर असलेला हिरडपुरी ( गुळज ) बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, 2 दरवाजे उघडले आहेत. जोगलादेवी व मंगरूळ बंधाऱ्याचे प्रत्येकी 5 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे गोदावरीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असून गोदाकाठच्या गावांना प्रशासनाने
सतर्कतेचा इशारा
दिला आहे.

पिकांचे मोठे नुकसान
या पावसाने शेतकऱ्यांची सर्व पिके मातीमोल झाली असून यामध्ये ऊस, कापूस, तूर, मूग, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या अती मुसळधार पावसामुळे नदीवरील प्रकल्पाच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ झाली आहे. हिरडपुरी बंधारा भरला असून दोन दरवाजे उघडण्यात आली आहेत. नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे , जीविताची , पशुधनाची , वीटभट्टी साहित्य इतर कोणतीही हानी होणार नाही, यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी , असे देखील आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close