आपला जिल्हा

दूध उत्पादकांच्या विश्वासाचा धागा दूध संघाने जोडला-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड — बीड तालुका दूध संघाची स्थापना मुळातच शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेली आहे या परिसरातील शेतकऱ्यांचा म्हणजेच दूध उत्पादकांचा विश्वासाचा धागा संघाशी जोडला गेला आहे म्हणूनच हा दूध संघ यशस्वीपणे आणि नफ्यात चालू असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

बीड तालुका दूध व्यवसायिक सहकारी संस्था संघ व केशर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रोडूसर कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी ह भ प मंजरीकर महाराज, गजानन बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे, अरुण डाके, दिनकर कदम, नानासाहेब काकडे, सखाराम मस्के, काकासाहेब जोगदंड, मिसाळ साहेब, किरण देशपांडे आदी उपस्थित होते

प्रारंभी स्वर्गीय काकू नाना यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे उपाध्यक्ष मनोज पाठक कार्यकारी संचालक एस जी श्रीखंडे, जगन्नाथ मोरे, बाबासाहेब खिल्लारे, सर्जेराव खटाने, कल्याण खांडे, रामचंद्र घरत, बळीराम कुटे,भागवत घोडके, शेषराव कोळेकर, नवनाथ राऊत, एस एन आहेर, राहुल बडगे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास बडगे यांनी केले यावेळी ते म्हणाले की अण्णांच्या मार्गदर्शनाखाली संघाची वाटचाल यशस्वीपणे सुरू असून अत्यंत बारकाईने लक्ष देऊन दूध उत्पादकांना वेळेवर पेमेंट व त्यांच्या अडचणी सोडवण्याच्या त्यांच्या सूचना असतात दूध संघाने शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने निर्णय घेतले असून आगामी काळातही शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दूध संघ सदैव तत्पर राहील यावेळी केशर मिल्क कंपनीचे नाना साहेब काकडे म्हणाले की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या बीड तालुका दूध संघाने दुधापासून दुग्धजन्य पदार्थ सुरू केले आहेत अधिक मागणी होत असताना आता दूध संकलन अधिकाधिक होणे गरजेचे आहे

यावेळी प्रा जगदीश काळे म्हणाले की दूध संघाची सुरुवात सहाशे लिटर पासून सुरू झाली आज हेच संकलन एक लाख लीटर पर्यंत गेले आहे कर्नाटक हैदराबाद आणि महानंद सारख्या ठिकाणी दुधाची मागणी वाढू लागली आहे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत आहे संघाच्या माध्यमातून आता दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होऊ लागली आहे यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पनीर खवा लस्सी ताक श्रीखंड आम्रखंड यासारखे पदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत म्हणूनच हा संघ नफ्यात आहे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्था आणि संस्थांचे संचालक लक्ष देऊन काम करत आहेत लवकरच गजानन बँकेची मोबाईल बँकिंग सेवा यामध्ये फोन ची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले

यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच बीड तालुका दूध संघाची स्थापना करण्यात आलेली आहे आज का दुध संघ साडेचार कोटी रुपये नफ्यात आहे या परिसरातील दूध उत्पादक शेतकरी जोड धंदा म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय करतात हजारो शेतकऱ्यांना या संघाचा खूप मोठा फायदा होत आहे स्पर्धेच्या काळात आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत उत्तम दर्जा आणि गुणवत्ता युक्त पदार्थ यांची निर्मिती यामुळे अभंगाचे दुग्धजन्य पदार्थ बाजारात जाऊ लागले आहे शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करण्याचा प्रयत्न आपण करत असतो मध्यंतरी दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले त्याच बरोबर महामारी मुळे अनेक जण अडचणीत आले होते त्यांनाही संस्थांच्या माध्यमातून बदल करण्यात आली आहे हा खारीचा वाटा उचलण्याचा आपला छोटासा प्रयत्न आहे दूध संघाच्या वतीने आता ठिकाणी बल कुलर बसवण्यात येणार असून त्यामुळे दर्जेदार दूध ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे आगामी काळात दूध पावडर तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचा मानस असून केंद्र सरकारकडे याबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे दूध उत्पादकांच्या विश्वासाचा धागा दूध संघाने जोडला आहे गाई म्हशी घेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत हवी असेल तर ते देखील करता येईल त्यांनी कौतुक केले शेवटी उपाध्यक्ष मनोज पाठक यांनी आभार व्यक्त केले

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close