क्राईम

शिवसेना उपजिल्हा प्रमुखांवर भर रस्त्यावर प्राणघातक हल्ला

बीड — बीड परळी महामार्गावरील घोडका राजुरी शिवारात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांच्यावर दहा ते पंधरा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान जगताप यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून हा हल्ला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीतुन झाला असल्याचा आरोप केला जात आहे.

     शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे बीड दौऱ्यावर आले असता शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पैसे कमावण्याच्या नादात पक्षाकडे लक्ष देत नसल्याची तसेच सत्ताधाऱ्यां विरोधात तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार करण्यात आल्यानंतर माझ्यावर हा जीवघेणा हल्ला झाला असल्याचं जगताप यांनी म्हटले आहे. मला मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी पूलाखाली फेकून देण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर हे नंबर प्लेट नसलेल्या  मोटारसायकल वरून आले असल्याचं देखील जगताप यांनी सांगितल.

घटनास्थळावर उपस्थित असलेले आणि भांडण सोडणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने घडलेला प्रकार सांगितले आहे. यामध्ये मारहाण करणाऱ्याच्या हातात तलवार होती, असे देखील घटनास्थळी उपस्थित असलेल्या सदाशिव किसन सानप यांनी सांगितले आहे. सदाशिव किसन सानप हे हनुमान जगताप यांच्यासोबत गाडीवरती होते. राजकीय द्वेषापोटी माझ्या नवऱ्याला मारहाण केली आहे.
यापूर्वी त्यांचे ३ ते ४ ऑपरेशन झाले आहेत. कोरोना मधून आत्ताच सुखरूप बाहेर आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सत्ताधारी कार्यकर्ते यांनी मिळून आज माझ्या नवऱ्याला मारहाण केली आहे, असा आरोप हनुमान जगताप यांच्या पत्नी उर्मिला जगताप यांनी केला आहे. या घटनेनंतर उशिराने जिल्हा रुग्णालयात भेटण्यासाठी आलेल्या, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर, जखमी हनुमान जगताप यांच्या नातेवाइकांनी, तुम्हीच यामध्ये सहभागी आहात. तुम्ही हे सगळे काही केले आहे. असा थेट आरोप केला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close