महाराष्ट्र

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने पूर्ण करावे -माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

समृध्दी महामार्गा लगत समांतर बुलेट ट्रेनचा सर्वे व्हावा

बीड — नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे ३० किमीचे काम पूर्ण व ३० किमीचे काम प्रगतीपथावर असून या मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी तातडीने चाचणी घेण्यात यावी व उर्वरीत बीड ते परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे

अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

दिनांक २६आॅगस्ट२०२१ रोजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची औरंगाबाद येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भेट घेतली. मुंबई ते नागपूर हा समृध्दी मार्ग सुरू होत आहे या मार्गाच्या समांतर मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. देशात नवीन बुलेट
ट्रेनसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. त्या नवीन मार्गामध्ये या मार्गाचा समावेश करण्यात यावा. या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा व विदर्भाचे दळणवळण सुधारेल व औरंगाबाद व नागपूर या शहरातील व्यापार व उद्योग वाढीसाठी मोठा
फायदा होऊ शकेल. या नवीन रेल्वे मार्गाची योग्यता तपासून सर्वेक्षण करण्यात यावे अशी विनंती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे केली आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close