आपला जिल्हा

दुचाकीची एकमेकींना धडक; दोन्ही मोटरसायकल स्वारांचा मृत्यू

माजलगाव — दोन मोटारसायकलच्या झालेल्या धडकेत दोन्ही मोटारसायकल स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी दि.27आॅगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास माजलगाव तेलगाव रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर घडली.
अरुण जगन्नाथ शेजूळ वय 65वर्ष, रा. आबेगाव, नंदकुमार संतराम महिपाल वय 38वर्ष, रा.शिंदेवाडी अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. अरुण शेजूळ हे माजलगावहून खामगाव पंढरपूर महामार्गावरून दुचाकीवरुन शेतात जात होते. रिलायन्स पंपाजवळ आल्यानंतर त्यांनी अचानक गाडी वळवली. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या नंदकुमार संतराम मायकर यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली. दुचाकीवरुन दोघेही रस्त्यावर पडले. रस्त्यावर पडल्याने दोघांच्याही डोक्याला मार लागल्याने गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी दोघांनाही माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. अरुण शेजूळ हे जलसंपदा विभागात अभियंता होते. दोन वर्षापासून ते निवृत्त झाल्याने शेती व्यवसाय करत होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close