क्राईम

स्थानिक प्रशासन टक्केवारी घेण्यात व्यस्त; जिल्हा प्रशासनानाला गेवराईत येऊन करावी लागली थेट कारवाई

गेवराई  — गेवराई तालुक्यात वाळू उपसा सुरूच असून महसूल प्रशासन पूर्णतः यात सहभागी असल्याने ही चोरटी वाहतूक सुरू आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ओरड गेल्यानंतर स्थानिक अधिकारी छोटी मोठी कारवाई करत असून हेच आधिकारी यात सहभागी असल्याने वाळू माफिया राजरोजपणे उपसा करत आहेत. या वाळू माफियांवर स्थानिक प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने स्वतः जिल्हाधिकारी असल्याची चर्चा तालुक्यातील सुरू आहे. स्थानिक प्रशासन टक्केवारी घेण्यात व्यस्त असल्याने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पोलीस अधीक्षक आर . राजा यांना सोबत घेऊन बुधवार दि.25 रोजी तालुक्यातील राक्षसभुवनमध्ये अवैध वाळूच्या 7 हायवा जप्त कराव्या लागल्या.

गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्याची मोठ्या प्रमाणात ओरड होत होती. त्यांच प्रमाणे वाळू घाटांचा प्रशासकीय लिलाव करण्यात यावा यासाठी सर्व स्तरातून मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन वाळु घाटांनाचे प्रशासकीय लिलाव करण्यात आले. परंतु प्रशासकीय लिलाव होऊन ही वाळू तस्कर अवैध रित्या वाळू उपसा करण्याचा सपाटा सुरुच आहे. या महसूल प्रशासन पूर्णतः यात सहभागी असल्याने ही चोरटी वाहतूक सुरू आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ओरड गेल्यानंतर स्थानिक अधिकारी छोटी मोठी कारवाई करत असून हेच आधिकारी यात सहभागी असल्याने वाळू माफिया राजरोजपणे उपसा करत आहेत. या वाळू माफियांवर स्थानिक प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याने स्वतः जिल्हाधिकारी असल्याची चर्चा तालुक्यातील सुरू आहे. स्थानिक प्रशासन टक्केवारी घेण्यात व्यस्त असल्याने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पोलीस अधीक्षक आर . राजा यांना सोबत घेऊन बुधवार दि.25 रोजी तालुक्यातील राक्षसभुवनमध्ये अवैध वाळूच्या 7 हायवा जप्त कराव्या लागल्या आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close