आपला जिल्हा

विकासाची कामे करणे हे आमचं कर्तव्य – नगराध्यक्ष

बीड — बीड शहरातील रेणुका नगर, पंचमुखी हनुमान परिसरात विविध विकास कामांविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी नगराध्यक्षांनी स्थानिक नागरिक आणि महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

स्थानिक महिलांनी आयोजित केलेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली.महिलांनी विकास कामाच्या बाबतीत निवेदन दिले.तसेच या भागातून जाणारा मुख्य सिमेंट रस्ता दर्जेदार केल्याबद्दल पुष्पगुच्छ आणि शाल,नारळ देऊन नगराध्यक्षांचे आभार मानले.
याप्रसंगी नगराध्यक्ष म्हणाले की, याभागात अनेक विकासाची कामे नगर पालिकेच्या माध्यमातून केली आहेत.महिलांनी बचत गट तयार करून नगर पालिकेच्या माध्यमातून विविध योजनेद्वारे लाभ घेण्याचा प्रयत्न करावा.24 वर्षांपासून घरपट्टी वाढवली नाही. 20 वर्षांपासून नळ पट्टी वाढवली नाही.कारण बीड शहरात मोठ्या प्रमाणात गोरगरिब नागरिक राहतात त्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होतो. रमाई घरकुल आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल साठी अर्ज करण्याचे देखील आवाहन केले. राजकारण करताना कसलाही जातीभेद न करता शहरातील प्रत्येक भागात विकासाची कामे केली.विकासाची कामे करणाऱ्याला सहकार्य करण्याचे आवाहन देखील नगराध्यक्षांनी केले.याभागात झालेल्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येक नागरिकांनी प्रत्येकी दोन झाडे लावून संगोपन करण्याची विनंती केली.
याप्रसंगी बांधकाम सभापती विनोद मुळूक, नगरसेवक गणेश वाघमारे रवींद्र कदम, नाना मस्के, प्रमोद शिंदे, ॲड. नागेश तांबारे, कपिल इनकर, कैलास गिराम, बजगुडे काका, बाबासाहेब मोरे बोराडे काका काटकर सर वाघमारे नवनाथ, हावळे सर, महानंदा गिराम, बजगुडे काकु, हंगे काकु, मनिषा वाघमारे, छायाबाई माने यांच्या सह स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close