आपला जिल्हा

बीड मधुन धावली उशिरा एक्सप्रेस; जनतेच्या भावनांशी खेळ कुठपर्यंत?

बीड — संथ गतीने सुरू असलेले नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावा. सोलापूर बीड जळगाव रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात यावी.यासाठी आज विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रेल्वेचा प्रतिकात्मक डब्बा बनवून तो डब्बा युवकांनी ओढला.

नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी स्वातंत्र्य काळापासून अनेक नेत्यांसह सर्वसामान्यांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र आजपर्यंत या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. मागासलेल्या बीड जिल्ह्यात रेल्वे आल्यानंतर विकासाचे वारे वाहू लागणार आहे. मागासलेला जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसली जाणार आहे रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे ‌नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासाठी केंद्राने 50 टक्के व राज्याचे 50 टक्के वाटा उचलायचा करार झालेला आहे. परंतु यामध्ये चालढकल होताना दिसत आहे. यामुळेच या रेल्वेमार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने अजून किती वर्षे लागतील हा प्रश्‍न याठिकाणी उपस्थित होत आहे. याबरोबरच सोलापूर-बीड-जळगाव हा नवीन मार्ग तात्काळ मंजूर करून याही कामाला सुरुवात करा अशी मागणी करत आज विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रेल्वेचा डब्बा बनवून ओढण्यात आला. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात बीड जिल्हा रेल्वे मार्ग, अहमदनगर-बीड-परळी या मार्गाचे काम लवकर करावे, आजपर्यंत रेल्वेच्या खर्चाचा आराखडा जनतेसमोर मांडावा, पालकमंत्री या नात्याने हा रेल्वेमार्ग कसा पूर्ण होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत याचबरोबर सोलापूर-बीड-जळगाव या रेल्वेमार्गाचे कामही तात्काळ सुरू करण्यात यावे यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी सत्ताधाऱ्यां विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . या आंदोलनाला विद्यार्थी रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी व शहरातील युवकांनी उपस्थिती दर्शवली.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close