आपला जिल्हा

बीड: जिल्हा परिषदेचा कारभार आता अजित पवार हाकणार

बीड – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पूणे येथील जात पडताळणी विभागाचे अजित पवार हे येत आहेत .कुंभार यांची बृहन्मुंबई महापालिकेचे सहआयुक्त म्हणून रुजू होतील .

राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढले  राज्य सरकारने आठ आयएएस अधिकार्‍यांच्या शुक्रवारी दि.20 ऑगस्ट रोजी बदल्या केल्या असून यामध्ये अजित कुंभार यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून बीड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अजित कुंभार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुण्याहून अजित पवार हे येत आहेत

कुंभार यांची कारकीर्द अत्यंत चांगली राहिली आहे .कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे बीड जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली होती .अजित कुंभार यांनी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केली. आहे,बीडच्या जि प चा कार्यभार सांभाळत असताना त्यांनी शिस्तबद्ध काम करून वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या जागी आता पुणेच्या जात पडताळणी विभागाचे अजित पवार हे कार्यभार सांभाळतील.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close