आरोग्य व शिक्षण

शाळा महाविद्यालय सुरू करण्याबाबत चार ते पाच दिवसात निर्णय — टोपे

पुणे — कोरोनामुळे सगळ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता शाळा, महाविद्यालय कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.अशातच आता राज्यातील शाळा उघडण्याबाबत येत्या चार ते पाच दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल असं राजेश टोपे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यातील शाळा, महाविद्यालय कधी उघडणार याबाबत निर्णय येत्या चार-पाच दिवसांमध्ये घेतला जाईल. शिक्षण विभाग टास्क फोर्सच्या अहवालाची वाट पाहत आहे. हा अहवाल आल्यानंतर संबंधित विभागाकडून निर्णय घेतला जाईल.येत्या पुढील काही दिवसात राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याच्या हाचलाची चालू होती. त्यामुळे आता शाळा उघडण्याची अजून प्रतिक्षा विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी लसीकरणात येणाऱ्या अडचणींना केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.
दरम्यान, राजेश टोपे यांनी सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशाराही दिला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनंही केलं आहे. राजकीय कार्यक्रम आणि इतर गोष्टींमुळे होणारी गर्दी टाळावी, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close