क्राईम

बीड:रा.प.म. विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यास मारहाण

बीड — राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात अविवाहित महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत मारहाण केल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी बुधवारी पीडित महिला कर्मचाऱ्यांनी विभागीय नियंत्रकांकडे या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे. या घटनेने एसटी महामंडळात खळबळ माजली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड होत असल्याचे प्रकार अधून मधून उघडकीस येतात. साधारणतः दोन वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्यांने आपल्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. या प्रकरणाची दक्षता समितीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा रापम विभागीय कार्यालय चर्चेत आले आहे. लेखा विभागात एका अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना प्रभारी लेखापाल नारायण मुंडे याने वाईट हेतूने स्पर्श करत छेडछाड केली. याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यास जात असताना नारायण मुंडे यांने कार्यालयाच्या पायरीवर पीडितेला अडवून मारहाण केली. तसेच तुझी नोकरी घालवण्यात येईल अशी धमकी दिली असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची तक्रार विभागीय नियंत्रक अजय मोरे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी अजय मोरे यांनी उलट पीडितेला तुझी मी डेपोत बदली करतो अन्यथा आणखी त्रास सहन कर असं निर्लज्जपणाच उत्तर दिलं असा आरोप पीडित महिलेने केला आहे अजय मोरे देखील आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान शुक्रवारी दोघांनाही समोरासमोर बोलावून चौकशी केली जाईल असं विभागीय नियंत्रक अजय मोरे यांनी म्हटला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close