आपला जिल्हा

निराधार अनुदान योजना: तहसीलदार वमनेंची चौकशी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

बीड — संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा बोजवारा उडवत योजनेचा लाभ वंचितांना मिळू नये यासाठी 5 हजार अर्जांपैकी केवळ 65 अर्जांना तहसीलदार शिरीष वमने यांनी मंजुरी दिली. शिवाय अनुदान समितीच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकरणी तक्रारीची दखल घेत सहाय्यक आयुक्तांनी वमने यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन दिवसात सखोल चौकशी करून नियमानुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र सहाय्यक आयुक्त ( महसुल ) डॉ.एस.पी.सावरगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे .
बीड चे तहसीलदार शिरीष वमने यांची कारकीर्द देखील आता वादग्रस्त ठरू लागली आहे. शासकीय योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच असलं तरी गोरगरिबांच्या न्याय हक्काला मुठ माती कशी दिल्या जाईल यावर त्यांचा भर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जुलै महिन्यामध्ये रेशन दुकानदारांनी जनतेला शासनाने दिलेल्या मोफत धान्याच वितरण केलं पण विकतचा माल पूर्ण गायब केला. 346 स्वस्त धान्य दुकानदारांपैकी बोटावर मोजण्याइतक्या दुकानदारांनी हा माल वाटप केला. शेकडो टन धान्याचा हा घोटाळा झाला असला तरी स्वतःची तुंबडी भरली की बस्स! गोरगरिबांच मला काय असं म्हणत झाल्या प्रकाराकडे वमने यांनी दुर्लक्ष केलं. गरिबांचा न्याय हक्क मारणे यावरच वमने यांनी लक्ष केंद्रित केले आहे.त्याचाच परिपाक म्हणून शिरीष वमने यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्राप्त झालेल्या चार ते पाच हजार निराधारांच्या अर्जा पैकी केवळ 65 अर्जांना मंजुरी दिली. याबरोबरच या समितीवर नियुक्त केलेल्या पदाधिकारी सदस्यांना त्यांनी अपमानास्पद वागणूक देत हम करे सो कायदा ही भूमिका घेतली. यासंदर्भात संतप्त झालेल्या संजय गांधी समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर , अशफाक इनामदार व अन्य पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर स्वांतत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत वमने यांच्यावर कार्यवाहीची मागणी केली होती . पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत : उपोषणस्थळी भेट देवुन विभागीय चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर दि .18 ऑगस्ट रोजी सहाय्यक आयुक्त ( महसुल ) यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवुन तक्रारीच्या अनुशंगाने तहसिलदार वमने यांच्या प्रकरणात सखोल चौकशी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी , बीड यांना दिले आहेत .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close