क्राईम

तीस वर्षापासून फरार असलेला आरोपी पोलिसांनी अखेर पकडला

केज — दरोडे सारख्या गंभीर गुन्ह्यात तब्बल तीस वर्षापासून फरार असलेला आरोपी सिनेस्टाईल पाठलाग करत केज पोलिसांनी पकडला. उत्तम शिवराम शिंदे असं पकडलेल्या आरोपीचं नाव असून त्याला क्रांतीनगर भागात जेरबंद करण्यात आलं
केज पोलीस ठाण्यात आरोपी उत्तम शिंदे याच्यावर सन १९९१ मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हापासून तो सुमारे तीस वर्षे फरार होता. परंतुत सन २०२० मध्ये चोरांच्या टोळीत सक्रिय असल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून उत्तम शिंदे हा सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलत असायचा. दरम्यान तो दि. १३ ऑगस्ट रोजी केज येथील क्रांतीनगर भागात आल्याची माहिती डीबी पथकाचे पोलीस नाईक दिलीप गित्ते यांना मिळाली.गुप्तता पाळून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी सर्व फिल्डिंग लावली. त्याला गाफील असताना रात्री जेरबंद करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली. रात्री अचानक पोलिसांनी त्याला घेरले असतानाही उत्तम शिंदे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, डीबीचे दिलीप गित्ते, अशोक नामदास, शेख मतीन, अशोक गवळी यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close