आपला जिल्हा

कोरोना सेंटरवर जेवण देणाऱ्या हाॅटेल चालकांची बीले जिल्हाधिकारी – तहसील कार्यालयाने रोखली

हाॅटेल चालक आले अडचणीत

गेवराई — कोविड केअर सेंटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणाचे डबे पुरवठा करणारे होटल चालक अडचणीत आले असून, त्यांची बीले ( देयके ) गेल्या चार महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाने रोखून धरली आहेत. वारंवार विनंती करून ही संबंधित विभाग कुठलीच कारवाई करीत नसल्याने हाॅटेल चालकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. दरम्यान, या आधीही, जेवणाच्या बीलाची फाईल हेतूपुरस्सर रोखल्याची चर्चा असून, जेवणातल्या डब्यात संबंधित तहसीलदाराला हात ओले करायचे होते, असा आरोप केला जात आहे.

कोरोना आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने, त्यांच्या खाण्या -पिण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. त्यामुळे, योग्य आहार रुग्णांना मिळावा म्हणून, जिल्हाभरातील कोविड केअर सेंटरवर जेवणाचा डब्बा पुरवठा करण्याचे टेंडर काढण्यात आले होते. सदरील टेंडर अपवाद वगळता एकाच व्यक्तीला देण्यात आले होते. परंतू , संपूर्ण जिल्ह्य़ात रुग्ण वाढल्याने जेवण वेळेवर जाण्यात अडचणी निर्माण झ्ल्याने, गेवराई तालुक्यातील कोविड केअर सेंटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवणाचे डबे पुरवठा करण्यासाठी तीन एजन्सीकडून निविदा मागवून, त्यांना विभागून सेंटर नुसार जबाबदारी देण्यात आली होती. नियमित व दर्जेदार जेवण देऊन, या सर्व होटल चालकांनी आपली जबाबदारी पार पाडली असून, त्यांनी पुरवठा केलेल्या जेवणाचे बील आरोग्य विभागात सादर केलेले आहे.
आरोग्य विभागाकडून होटेल चालकांनी दिलेली बीले तात्काळ मंजूर करून तहसील कार्यालयातपाठविण्यात येतात. या कार्यालयातून बील मंजूर करून
थेट धनादेश देण्यात येतो. या कार्यालयात हेतूपुरस्सर बीले रोखली जात आहेत. त्यामुळे, जिल्हा भराततील हाॅटेल चालक अडचणीत आलेत. उसनवार घेऊन हाॅटेल चालक जेवणासाठी किराणामाल आणतात. वेळेवर बीले मिळत नसल्याने, किराणा मालाचे होलसेल दुकानदार उधारी थकल्याने हाॅटेल चालकांना उधार देणे बंद केले आहे. जवळचे पैसे संपल्याने काय करावे ,असा प्रश्न उपस्थित झाल्याची प्रतिक्रिया एका हाॅटेल चालकाने दिली आहे.
या आधीही संबंधित विभागाने बीला मध्ये त्रुटी काढून फाईलवर पाचर मारली होती. हे काम तहसीलदार यांच्या इशाऱ्यावर चालते, अशी चर्चा आहे. दुर्दैव म्हणजे, गेवराई येथील तहसील कार्यालयाने या जेवणाच्या बीलाची फाईल अडवून ठेवल्याची माहीती उघडकीस आली असून, कोविड सेंटर विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या जेवणाच्या डबे बिलात हात ओले करून घ्यायचे होते. सदरील बाब उघडकीस येताच गेवराई तहसील विभागाला कोणी तरी झापल्याने होटेल चालकाची रोखलेल्या बिलाची रक्कम (धनादेश) तात्काळ देण्यात आला. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, अधूनमधून तहसीलदार बदलले असल्याने “तो” तहसीलदार कोण ? यावर उलटसुलट चर्चा असून, नवीन आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना सदरील बाब लक्षात आणून देण्यात येणार असल्याचे समजते. गेल्या चार महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाने रोखून धरली आहेत. वारंवार विनंती करून ही संबंधित विभाग कुठलीच कारवाई करीत नसल्याने हाॅटेल चालकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. नवीन आलेल्या जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी
हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा हाॅटेल चालक व्यक्त करत आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close