ब्रेकिंग

बीड जिल्ह्यात नगरच्या सीमावर्ती भागात पुन्हा चेक पोस्ट लागणार

बीड — जिल्ह्यामधील आष्टी गेवराई शिरूर आणि पाटोदा या तालुक्यात कोरोना च्या दुसऱ्या लाटेतील बाधित रुग्णांची संख्या अद्याप कमी झाली नाही. ही रुग्णसंख्या तातडीने आटोक्यात आणणे गरजेचे आहे. या रुग्ण संख्येचा अतिरिक्त ताण तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील आष्टी , गेवराई , शिरूर आणि पाटोदा या चार तालुक्यांमध्ये संलग्न असलेल्या नगर तालुक्यातील लोकांचे येणे जाणे हे निर्बंधित व्हावे व त्यावर नियंत्रण आणावे या दृष्टिकोनातून आष्टी , गेवराई ,शिरूर आणि पाटोदा या तालुक्यांच्या सीमांवर चेक पोस्ट लावणे गरजेचे आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी काढले आहेत.
नगर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात चेक पोस्ट लावण्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांना खालीलप्रमाणे आदेशित करण्यात आले आहे . बीड जिल्ह्यामधील आष्टी , गेवराई , शिरूर आणि पाटोदा या तालुक्यांमधील सर्व क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्हयांस लागून असलेल्या सीमावर्ती भागातील राष्ट्रीय महामार्ग , राज्य महामार्ग , जिल्हा मार्गावर चेक पोस्ट निर्माण करावेत . संबंधित तहसिलदार यांनी सदर चेक पोस्ट च्या ठिकाणी पोलीस विभाग , महसूल विभाग , आरोग्य विभाग व जिल्हा परिषद यांच्याकडील कर्मचाऱ्यांची नियुक्ती दोन शिफ्टमध्ये करावी व याबाबतचे आदेश दिनांक . 31.07.2021 रोजी पर्यंत निर्गमित करावेत . तसेच संबंधित तहसिलदार यांनी चेकपोस्ट ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही करावी . तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सदर चेकपोस्ट ठिकाणी अँटीजन टेस्ट करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही अनुसरावी . सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागांची राहील . दरम्यान उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.असे आदेश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी निर्गमित केले आहेत .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close