क्राईम

जाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल

बीड — दारू पिऊन घरी का आलास असा जाब विचारताच दारुड्या मुलांनी बापा वरचा कोणी हल्ला केला या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बाबासाहेब नागरगोजे वय 50वर्ष, रा. लिंबा, ता. शिरूर का. असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. गणेश नागरगोजे यांचा मुलगा स्वामी यास दारूचे व्यसन आहे. मंगळवार दि.13 जुलै रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास स्वामी दारू पिऊन घरी आला. त्यामुळे गणेश नागरगोजे यांनी त्याला दारू पिऊन घरी का आलास? असा जाब विचारला आणि त्याची कानउघडणी केली. वडिल रागावल्याने संतापलेल्या स्वामीने चाकूने त्यांच्यावर हल्ला चढविला आणि कपाळावर, खांद्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गणेश नागरगोजे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी दि.20 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला असे पोलीस हवालदार हरी जाधव यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून स्वामी गणेश जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close