क्राईम

खडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

बीड — आष्टी तालुक्यातील मौजे खडकत येथील विठोबा देवस्थान ईनामी जमिन गट नंबर 377 व जुना 112,114,क्षेत्र 18 हेक्टर 34 आर ही जमिन कोरोना कालावधीत हरिदास दशरथ सातपुते व फक्कडनाथ लिंबाजी कव्हळे यांनी बनावट दस्तावेज तयार करून बेकायदेशीर रित्या हस्तांतरण केले असून

याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
हरिदास दशरथ सातपुते व फक्कडनाथ लिंबाजी कव्हळे दोघेही खडकत येथील रहिवाशी नसून ग्रामस्थांच्या परस्पर जमिन हडप करण्यात आली आहे. संबधित प्रकरणात महसुल प्रशासन व भुमाफिया यांनी संगनमताने जमिन गैरव्यवहार करण्यात आलेला आहे. या प्रकरणात जबाबदार संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच सध्याचे फेरफार रद्द करण्यात येऊन जमिन देवस्थानच्या नावे हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, अतुल शिंदे, सुनिल पवार रा. खडकत ता. आष्टी.जि.बीड यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महसुल मंत्री, महसुल व वनविभाग मंत्रालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना लेखी निवेदनाद्वारे करत आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

उपजिल्हाधिकारी भु-सुधार यांचे फेरफार रद्द करण्याच्या आदेशाला केराची टोपली —

उपजिल्हाधिकारी(सा) भु-सुधार बीड यांनी उपविभागीय आधिकारी, तहसिलदार आष्टी यांना सन 2018 मधिल व पुर्वीच्या अगोदरचे देवस्थान ईनामी जमिनी खालसा करण्याबाबतच्या आदेशानुसार आधिकार अभिलेखात नोंद न घेणेबाबतचे आदेश देऊन सुद्धा त्याचे पालन करण्यात येत नाही. असे देखील तक्रारीत म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close