आपला जिल्हा

शिरूर तालुक्यात आणखी निर्बंध कडक

बीड — कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पाटोदा,आष्टी , गेवराई या तीन तालुक्या बरोबरच शिरूर तालुक्यात देखील जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आज नव्याने आदेश काढत शिरूर तालुक्यात सर्व दुकाने साडेबारा वाजेपर्यंत च सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच नागरिकांना दुपारी एक नंतर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यात दुपारी चार वाजेपर्यंत व्यवसायिक प्रतिष्ठान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे यापूर्वीच आष्टी पाटोदा व गेवराई या तीन तालुक्यांमध्ये दुपारी साडेबारा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता शिरूर तालुक्यामध्ये देखील निर्बंध आणखी कडक करत साडेबारा वाजेपर्यंत दुकान सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा पूर्वीच्याच नियमानुसार सुरू राहणार असल्याचं आदेशात म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close